Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Electric Scooter : सिंगल चार्जमध्ये 130 किमी धावणारी शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च! खरेदी करा फक्त 5,000 रुपयांमध्ये…

तुम्हालाही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर चांगली संधी आहे. जबरदस्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही फक्त ५ हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Electric Scooter : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर खूपच वाढल्याने त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होत आहे. इंधनावरील वाहने वापरणे सर्वसामान्यांना न परवडण्यासारखे झाले आहे. त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

देशात अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारात लॉन्च केली आहेत. तसेच ऑटो कंपन्यांकडून इलेक्ट्रिक वाहने निर्मिती करण्याकडे अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करताना वाहन निवडताना अनेक पर्याय मिळत आहेत.

भारतामध्ये भन्नाट इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. जी एकदा चार्ज केल्यानंतर जवळपास १३० किमीपर्यंत मायलेज देते. त्यामुळे तुम्हाला पेट्रोलची गरज पडणार नाही. तसेच तुमच्या पैशांची बचत देखील होईल.

ओकाया फास्ट एफ3 इलेक्ट्रिक स्कूटर असे या स्कूटरचे नाव आहे. फक्त ५००० हजार रुपयांमध्ये तुम्ही या स्कूटरचे मालक बनू शकता. कमी बजेट असणारे देखील ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकतात.

130km रेंजसह आणि शक्तिशाली बॅटरी पॅक

ओकाया फास्ट एफ3 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये शक्तिशाली बॅटरी पॅक देण्यात आला आहे. तसेच या स्कूटरमध्ये जबरदस्त रेंज देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात दाखल झाली आहे.

या स्कूटरमध्ये तुम्हाला ३.४ kwh क्षमतेचा शक्तिशाली लिथियम आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. BLDC तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक मोटर या स्कूटरमध्ये बसवण्यात आली आहे. जी उत्तम काम करते.

या फायनान्स प्लॅनद्वारे, तुम्ही फक्त 5,000 रुपयांच्या डाऊन पेमेंटसह खरेदी करू शकता.

जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला ही स्कूटर खरेदी करायची असेल तर काळजी करू नका. तुम्हाला या स्कूटरवर EMI पर्याय देखील दिला जात आहे. या स्कूटरची बाजारातील किंमत 1,08,965 रुपये आहे.

पण तुम्हाला सर्व पैसे भरण्याची गरज नाही. कारण तुम्ही EMI चा लाभ घेऊन फक्त ५००० हजार रुपयांमध्ये या स्कूटरचे मालक बनू शकता. बाकीचे पैसे तुम्हाला फायनान्स कंपनीकडून दिले जातील. ज्याचा तुम्हाला दरमहा 2,308 रुपये हफ्ता भरावा लागेल.