Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Electric Scooters : देशातील या शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर देतात २०० किमीची रेंज, टॉप स्पीड पाहून लोकही खरेदीस उत्सुक…

तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सर्वाधिक रेंज देणारी काही स्कूटर आहेत. त्या खरेदी करून तुम्ही इंधनाचे पैसे वाचवू शकता.

Electric Scooters : देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढल्याने आता अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर अधिक भर देत आहेत. तसेच इंधनाच्या किमती वाढल्याने वाहन खरेदीदार देखील इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी देखील वाढली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मागणी वाढल्याने कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन देखील वाढवले आहे. सध्या भारतीय बाजारात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर दाखल झाली आहेत. पण काही स्कूटरची रेंज कमी असल्याने ग्राहकांना ते खरेदी करण्यास अडचणी येत आहेत.

पण देशात अशा काही कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध झाली आहेत त्यांची सिंगल चार्जवर २०० किमी ते त्यापेक्षा अधिक धावण्याची रेंज आहे. त्यामुळे ग्राहकांना इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. तसेच या स्कूटरचा टॉप स्पीड देखील जबरदस्त देण्यात आला आहे.

Prevail Electric Elite Scooter

Prevail Electric Elite ही इलेक्ट्रिक स्कूटर देखील पूर्ण वैशिष्ट्यांसह भारतीय ऑटो बाजारात दाखल झाली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 220 किमीची रेंज देत आहेत. तसेच या स्कूटरचा टॉप स्पीड 80 किलोमीटर प्रति तास देण्यात आला आहे.

स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.30 लाख रुपये आहे. त्यामुळे ग्राहकांना २०० किमी पेक्षा जास्त लांबीचा प्रवास करण्यासाठी ही इलेक्ट्रिक स्कूटर चांगला पर्याय आहे. तसेच कमी वेळात जास्त प्रवास करण्याची क्षमता देखील या स्कूटरमध्ये आहे.

Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर

Ola कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर देशात सध्या सर्वाधिक विक्री होत आहेत. Ola ही सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करणारी कंपनी ठरली आहे. Ola S1 Pro ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 181 किमी पर्यंतची रेंज देते. तर या स्कूटरचा टॉप स्पीड 116 किलोमीटर प्रति तास इतका आहे.

Simple One Electric Scooter

Simple One Electric Scooter या स्कूटरला देखील लोकांची चांगली पसंती मिळत आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 1.10 लाखांपासून सुरू होते आणि रु. 1.45 लाखांपर्यंत जाते. सिंगल चार्जमध्ये सर्वाधिक ३०० किमीची रेंज देणारी स्कूटर आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 105 किलोमीटर प्रति तास देण्यात आला आहे.