भारत

Electric Volvo EX30 : लवकरच लॉन्च होणार व्होल्वो EX30 लक्झरी इलेक्ट्रिक कार, Kia EV 6 ला देणार टक्कर

Published by
Ahmednagarlive24 Office

Electric Volvo EX30 : जगभरात आता अनेक कंपन्यांकडून इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली जात आहेत. तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीमध्ये देखील वाढ झाली आहे. भारतीय ऑटो क्षेत्रात देखील आता अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे.

भारतात सध्या अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा पर्याय मिळत आहे. मात्र त्यांच्या किमती अधिक असल्याने ग्राहकांना अशा कार खरेदी करणे परवडत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता अनेक कंपन्यांकडून ग्राहकांना परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जात आहेत.

आता भारतीय मार्केट गाजवण्यासाठी आणखी एक इलेक्ट्रिक कार लॉन्च होणार आहे. Volvo EX30 इलेक्ट्रिक कार लॉन्च होणार आहे. ही इलेक्ट्रिक कारमधील लक्झरी कार असणार आहे.

इलेक्ट्रिक क्षेत्रात धमाका करण्यासाठी Volvo EX30 इलेक्ट्रिक कार तयार असल्याचे बोलले जात आहे. स्वीडनची लक्झरी कार कंपनी Volvo लवकरच ही कार लॉन्च करणार आहे.

Volvo EX30 कार करणार धमाका

Volvo कंपनीकडून नवीन इलेक्ट्रिक कार छोट्या मॉडेलमध्ये सादर केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहक या नवीन लक्झरी कारच्या प्रतीक्षेत आहेत. ही व्होल्वो कार कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून सादर केली जाईल.

या नवीन इलेक्ट्रिक कारच्या माध्यमातून कंपनी 1.2 दशलक्ष टार्गेट लोकांना एक नवीन कार उपलब्ध करून देणार असल्याचीही माहिती मिळत आहे. तसेच कंपनीकडून २०२५ सालापर्यंत विक्री वाढवण्याकडे लक्ष देत आहे.

ही कार चीनमध्ये तयार केली जाईल, जी चीनमध्ये तसेच जागतिक बाजारपेठेत विकली जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ही इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत देखील लवकरच आगमन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

व्होल्वो EX30 कारला उत्तम लुक मिळेल

व्होल्वो EX30 या इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात येणार आहेत. तसेच कारचा लूकही दमदार असणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक सेगमेंटमधील ही पहिली लक्झरी कार असणार आहे. ही इलेक्ट्रिक कार 7 जून 2023 रोजी जागतिक स्तरावर लॉन्च केली जाऊ शकते.

Volvo EX30 बरोबर कोण स्पर्धा करेल?

सध्या ऑटो क्षेत्रात अनेक इलेक्ट्रिक कार लॉन्च झाल्या आहेत. तसेच Volvo EX30 ही इलेक्ट्रिक कार Kia EV 6 शी स्पर्धा करेल. कारचे टेललाइट्स आणि अनेक फीचर्स हे इतर कारपेक्षा वेगळे असणार आहेत.

Ahmednagarlive24 Office