7th Pay Commission Breaking : केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षातील DA वाढ अजूनही झालेली नाही. मात्र कर्मचाऱ्यांना आशा होती की अर्थसंकल्पानंतर DA वाढ होऊ शकते मात्र अद्याप तसे काही झालेले नाही. कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत मोठे अपडेट समोर आले आहे.
नवीन वर्षातील होळी लवकरच येत आहे. मात्र त्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. कारण केंद्र सरकारकडून होळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
होळी 2023 नंतर केंद्रीय कर्मचार्यांचे किमान वेतन नक्कीच वाढू शकते. या वाढीमुळे, किमान वेतन रु. 18,000 च्या अलीकडील स्तरावरून रु. 26,000 पर्यंत वाढेल. नवीन वर्षातील होळी ८ मार्च रोजी आहे.
DA वाढ
केंद्र साकरकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातील पहिली वाढ केली जाऊ शकते. तसेच सरकारकडून फिटमेंट फॅक्टरवर देखील निर्णय घेतला जाऊ शकतो.
सामान्य फिटमेंट फॅक्टर सध्या 2.57 टक्के आहे. 4200-ग्रेड वेतनामध्ये 15,500 रुपये मूळ वेतन असलेल्या व्यक्तीसाठी पूर्ण वेतन 15,500 X 2.57 रुपये किंवा 39,835 रुपये आहे. 6व्या CPC ने 1.86 चा फिटमेंट रेशो प्रस्तावित केला आहे.
पगार
वर्षातून दोन वेळा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाते. मात्र या वर्षी अजून एकदाही महागाई भत्ता वाढवण्यात आलेला नाही. होळीच्या सणानंतर मार्च 2023 मध्ये त्याची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली जाऊ शकते. कर्मचारी आता सरकारकडे फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवण्याची मागणी करत आहेत. या वाढीमुळे किमान वेतन सध्याच्या 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये होईल.
डीए कधी वाढवला जाणार?
कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वर्षातील पहिली वाढ देखील झाली नाही. मात्र होळीपूर्वी सरकार कर्मचाऱ्यांना गोड बातमी देऊ शकते. DA वाढीमुळे देशातील 68 लाख ज्येष्ठ नागरिकांना आणि सुमारे 47 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
सध्या कर्मचाऱ्यांचा DA २८ टक्के इतका आहे. मात्र जर कर्मचाऱ्यांचा DA ३ टक्क्यांनी वाढवला गेला तर त्यांचा DA ४१ टक्के होईल. मागील वेळेस कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ३ टक्के वाढ करण्यात आली होती. DA वाढ झाली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.