EPFO : मस्तच! घरबसल्या UMANG ॲपवरून सहज काढता येणार पीएफ फंडातील पैसे, जाणून घ्या प्रक्रिया

Ahmednagarlive24 office
Published:

EPFO : तुम्हीही पीएफ फंडातील पैसे काढू इच्छित असाल तर तुम्ही सहजपणे आता हे पैसे काढू शकता. तुम्हाला पैसे काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही UMANG ॲपवरून सहज पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये UMANG ॲप डाऊनलोड करावे लागेल.

नोकरी करत असताना अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही ठराविक रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या स्वरूपात जमा केली जाते. ही रक्कम कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या वेळी मिळतात.

सेवानिवृत्तीनंतर कर्मचारी त्यांच्या पीएफ फंडातील पैसे काढू शकतात. परंतु जर कोणत्याही कर्मचाऱ्याला पैशाची गरज असेल तर तो कर्मचारी कधीही पीएफ फंडातील पैसे काढू शकतो.

पीएफ फंडातील कपैसे कर्मचाऱ्यांना सहजासहजी काढता यावेत यासाठी आता सरकारने उमंग ॲप लॉन्च केले आहे. या ॲपद्वारे कर्मचारी सहज घरबसल्या पैसे काढू शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कोणताही त्रासाशिवाय पैसे मिळणार आहेत.

अनेकदा कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये पैशांची गरज असते. त्यामुळे पीएफ फंडातील पैसे काढणे गरजेचे असते. त्यासाठी कर्मचाऱ्यांना बँक किंवा पीएफ कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागत होत्या.

कर्मचारी अनेकदा लोक घर दुरुस्ती, शिक्षण, लग्नाचा खर्च, कुटुंबातील सदस्यांच्या आजारावरील खर्च किंवा स्वत:साठी आवश्यक खर्चासाठी पीएफमधून पैसे काढतात. आता पीएफचे पैसे घरबसल्या काढणे शक्य झाले आहे.

उमंग ॲपद्वारे कर्मचारी सहज पीएफ रक्कम तपासू शकतात. पीएफ शिल्लक तपासता येते आणि एसएमएस, ऑनलाइन, मिस्ड कॉल इत्यादी वापरून तसेच उमंग ॲप वापरून पैसे काढता येतात.

उमंग ॲपद्वारे ईपीएफ शिल्लक कशी तपासायची?

उमंग ॲप उघडा
EPFO वर क्लिक करा
Employee Centric Services वर क्लिक करा
View Passbook पर्यायावर क्लिक करा
तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड द्या
तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP मिळेल
आता तुम्ही तुमची ईपीएफ शिल्लक तपासू शकता
लक्षात ठेवा, तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला वैध कारण द्यावे लागेल

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe