भारत

EPFO पेंशन वाढ होणार ! कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा

Published by
Sushant Kulkarni

केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्याने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. 7 वा वेतन आयोग 2026 मध्ये संपुष्टात येणार असल्याने त्यानंतर 8वा वेतन आयोग लागू केला जाणार आहे.

यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तसेच पेन्शनधारकांच्या मिळकतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.या वेतन आयोगासंदर्भात आता विविध आर्थिक तज्ज्ञ आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले अंदाज मांडायला सुरुवात केली आहे.

फिटमेंट फॅक्टरमुळे वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ

1982 बॅचचे आयएएस अधिकारी आणि भारताचे माजी सचिव सुभाष चंद्रा गर्ग यांनी राजस्थान केडरबद्दल बोलताना, सरकार 8व्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टरला मान्यता देऊ शकते, असे मत व्यक्त केले आहे. फिटमेंट फॅक्टर 2.86 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी आहे, मात्र हे प्रमाण पूर्णतः लागू होणार का, याबाबत शंका आहे.

गर्ग यांनी पुढे स्पष्ट केले की, 2026 मध्ये नवीन वेतन आयोग लागू होणार असल्याने त्यावेळी महागाई भत्ता (DA) 60 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन तसेच पेन्शनधारकांच्या निवृत्ती वेतनामध्ये वाढ होऊ शकते.

पगार आणि पेन्शन कशी वाढेल?

नवीन वेतन आयोगानुसार, फिटमेंट फॅक्टर ठरवताना 1 जानेवारी 2026 पर्यंतच्या मूळ वेतनासोबत DA (महागाई भत्ता) देखील विचारात घेतला जाणार आहे. सध्या DA 53 टक्के आहे, परंतु 2025 पर्यंत तो 60 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसेच पेन्शनधारकांच्या मिळकतीत चांगली वाढ होईल.

गर्ग यांच्या अंदाजानुसार, जर फिटमेंट फॅक्टर 1.6 वरून 2.86 पर्यंत वाढवला गेला तर कर्मचाऱ्यांचे वेतन मोठ्या प्रमाणात वाढू शकते. काही तज्ज्ञांच्या मते, हा फॅक्टर 10 टक्क्यांपासून 30 टक्क्यांपर्यंत लागू केला जाऊ शकतो. यामुळे वेतन आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा

नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनीही या वाढीच्या शक्यतेवर आपले मत व्यक्त केले आहे.त्यांच्या अंदाजानुसार,नवीन वेतन आयोगानुसार 2.86 टक्के फिटमेंट फॅक्टरचा विचार केला जाऊ शकतो.जर हा प्रस्ताव मान्य झाला,तर पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होईल.

महागाईच्या काळात वेतनवाढ गरजेची

सध्याच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर 8वा वेतन आयोग हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे.गेल्या काही वर्षांत देशातील महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे,त्यामुळे नवीन वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीला आधार मिळेल.

तज्ज्ञांच्या मते,आगामी काळात केंद्र सरकार वेतन आयोग आणि पेन्शन वाढीबाबत अंतिम निर्णय घेईल आणि त्यानुसार याची अंमलबजावणी केली जाईल. यामुळे EPFO पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून सरकार लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करेल.

Sushant Kulkarni