म्हातारपणही आनंदात घालवता येणार ! प्रत्येक महिन्याला मिळणार 5 हजार 550 रुपयांची इन्कम, पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक कराच

Ahmednagarlive24 office
Published:

Post Office Scheme : आपल्यापैकी अनेकजण कष्टाने कमावलेला पैसा हा वाढावा यासाठी विविध ठिकाणी गुंतवणूक करतात. अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. जास्तीचा परतावा मिळावा यासाठी अनेक जण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या जोखीम पूर्ण ठिकाणी देखील गुंतवणूक करत आहेत.

परंतु शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. आपल्या देशात आजही गुंतवणुकीसाठी आजही सरकारी बचत योजनांना विशेष प्राधान्य दिले जात आहे. सरकारी बचत योजनांमध्ये केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित राहत असल्याने गव्हर्मेंट सेविंग स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक असल्याचे चित्र आहे.

दरम्यान जर तुम्हीही सरकारी बचत योजनेत गुंतवणुकीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका सुरक्षित बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते.

येथील पैसे हे कधीच बुडत नाहीत. यामुळे पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेकजण पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीम मध्ये गुंतवणूक करत आहेत. पोस्टाची ही योजना गुंतवणूकदारांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. याचे कारण म्हणजे या योजनेत गुंतवलेला पैसा हा पूर्णपणे सुरक्षित तर राहतोच शिवाय या गुंतवणुकीवर पोस्टाच्या माध्यमातून चांगला परतावा देखील दिला जात आहे.

कशी आहे पोस्टाची मंथली इनकम स्कीम

ही योजना गुंतवणूकदारांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. या योजनेत सिंगल अकाउंट आणि जॉईंट अकाउंट ओपन केले जाऊ शकते. सिंगल अकाउंट ओपन केल्यास कमाल नऊ लाख रुपये आणि जॉईंट अकाउंट ओपन केल्यास कमाल 15 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत, गुंतवणूकदाराला दरमहा खात्रीशीर परतावा मिळतो. या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर पोस्टाच्या माध्यमातून 7.4% या व्याज दराने परतावा दिला जात आहे.

जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत सिंगल अकाउंट ओपन करून 9 लाख रुपये एकरकमी जमा केले तर त्याला प्रत्येक महिन्याला 5 हजार 550 रुपये व्याजाच्या स्वरूपात मिळणार आहेत. ही योजना पाच वर्षांसाठी आहे.

म्हणजेच गुंतवणूकदाराने जर सिंगल अकाउंट ओपन करून 9 लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर व्याजाचे एकूण उत्पन्न ३.३३ लाख रुपये एवढे राहणार आहे. जर तुम्हाला आयुष्यभर या योजनेतून कमाई करायची असेल तर मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा गुंतवणूक करावी लागणार आहे. योजनेच्या रकमेवर मिळणारे व्याज दरमहा पोस्ट ऑफिस बचत खात्यात जमा केले जाते.

विशेष बाब म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेतील गुंतवणुकीवर टीडीएस कापला जात नाही. पण लक्षात ठेवा की व्याजाच्या माध्यमातून जे उत्पन्न तुमच्याकडे येते त्यावर कर आकारला जातो. या योजनेत गुंतवलेला पैसा एका वर्षांनी काढला जाऊ शकतो. पण जर गुंतवणूकदाराने 1 ते 3 वर्षांच्या दरम्यान रक्कम काढली तर एकूण ठेव रकमेवर 2% दंड आकारला जातो. तसेच 3-5 वर्षांच्या आत पैसे काढले तर एकूण ठेवीवर 1% दंड आकारला जातो.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe