अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-गेल्या दोन वर्षांपासून WhatsApp Pay Beta भारतात उपलब्ध आहे. पण हे परवानगी न मिळाल्यामुळे अधिकृत लाँच करण्यात आले नव्हते. पण भारतात आता व्हॉट्सअप पे लाँच करण्यात आले आहे.
या अॅपचे लाँचिंग गेल्याच महिन्यात झाल्याचे फेसबुकचे संस्थापक आणि व्हॉट्सअपचे मालक मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले. मार्क झुकरबर्ग यांनी डिजिटल इंडिया या प्लॅटफॉर्मवर संवाद साधताना रिलायन्स इंडियाचे प्रमुख मुकेश अंबानींशी चर्चा केली.
यावेळी भारत आणि भारतीयांचे कौतुक फेसबुचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी केले आहे. आम्ही भारतात व्हॉटसअॅप पे लाँच केले आणि हे शक्य झाले ते भारतातल्या युपीआय व्यवस्थेमुळे, असे फेसबुचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे. तसेच १४० बँकांच्या तप्तरतेमुळे, असे कौतुक झुकेरबर्ग यांनी केले आहे.
हे शक्य करून दाखवणारा भारत हा पहिलाच देश आहे. पार्टनरिंग फॉर डिजीटल इंडिया या परिसंवादात ते सहभागी झाले होते. यात रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी देखील उपस्थित होते.
दरम्यान, भारतात WhatsApp Payment कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 400 मिलियन युजर्सला सेफ ट्रान्जक्शन करण्यात मदत करु शकते, असे व्हॉट्सअॅप पे च्या प्रवक्त्यांनी यापूर्वीच सांगितले होते.
त्याचबरोबर WhatsApp ची मालकी असलेल्या फेसबुकने गेल्या काही दिवसांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स जिओमध्ये तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केल्यामुळे व्हॉट्सअप पे अॅपवर WhatsApp आणि Jio मिळून काम करत आहेत.