कोरोना लसीचा ‘अति’ डोसही पडला महागात;रुग्णांना केले रुग्णालयात दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-कोरोना रोगाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगभरात या आजाराने कित्येकांचे बळी गेले असून बऱ्याच जणांना आपल्या रोजी रोटीला पण मुकावे लागले आहे.कोरोनाह अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लस दिली जात आहे. कोरोना लसीचे साईड इफेक्ट पण बऱ्याच देशांमध्ये दिसून येत आहेत. जर्मनीत असाच एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

कोरोना लसीचा ओव्हरडोस दिल्यानंतर आठ जणांची प्रकृती बिघडली आहे. आठही जण आरोग्य विभागात काम करणारे आहेत. जर्मनीच्या स्ट्रेसलँड भागात रविवारी आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनावरील प्रतिबंधित लस देण्यात येत होती.

फायझर-बायोएनटेकची हि लस प्रमाणापेक्षा पाच पट जास्त देण्यात आली. लस दिल्यानंतर चार जणांमध्ये फ्ल्यूची लक्षणे आढळून आली तर काहींची तब्येत बिघडली. घटना घडून गेल्यानंतर सर्वाना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यानंतर प्रशासनाच्या वतीने माफी मागण्यात आली. तसेच प्रमाणापेक्षा जास्त डोस दिल्यामुळे मोठे नुकसान होणार नसल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.काही दिवसांपूर्वी जर्मनीत लस घेण्यास नकार देण्यात आला होता. लस योग्य तापमानात ठेवली गेली नाही असा आक्षेप करण्यात आला होता.

अमेरिका ब्रिटनमध्ये आतापर्यंत जवळपास ३० लाखांहून अधिक लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आलाय.कोरोनाचा संसर्ग थांबवा म्हणून लसीवरील संशोधन अजूनही चालू आहे. काही ठिकाणी लसींच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून काही ठिकाणी युद्धपातळीवर काम चालू असल्याचे कळतय.

अहमदनगर लाईव्ह 24