Share Market Tips : एक्सपर्टने सांगितलेले हे 6 शेअर्स करतील मालामाल, इंट्राडेमध्ये गुंतवणूक केल्यास मिळेल नफा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Share Market Tips : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. मात्र त्याआधी शेअर मार्केट पूर्णपणे माहिती असणे गरजेचे आहे. शेअर मार्केटमध्ये पैसेही तेवढेच आहेत आणि जोखीमही तेवढीच आहे. त्यामुळे पैसे गुंतवणूक करत असताना एक्सपर्टने दिलेले सल्ले आगोदर जाणून घ्या.

गुरुवारी शेअर बाजार दोन दिवसानंतर तेजीमध्ये बंद झाला होता. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 187.31 अंकांनी घसरून 60,858.43 अंकांवर बंद झाला. निफ्टी 57.50 अंकांनी घसरून 18,107.85 वर बंद झाला.

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असताना तज्ञांनी दिलेले सल्ले खूप उपयोगी पडतात. तसेच आजही तज्ञांनी काही सल्ले आहेत. सुमित बगाडिया यांनी इंडिगोचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

या शेअर्ससाठी 2160 ते 2200 रुपयांचे लक्ष्य आणि 2080 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे. तर, त्यांनी आदित्य बिर्लाच्या शेअर्ससाठी १५५ ते १५८ रुपयांचे लक्ष्य आणि १४२ रुपयांचे स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

गणेश डोंगरे यांनी ऑइल इंडिया लिमिटेड (OIL) आणि पेट्रोनेट LNG चे शेअर्स इंट्राडेसाठी घेण्याचा सल्ला दिला आहे. ऑइल इंडिया 234 रुपये, लक्ष्य 240 रुपये आणि स्टॉप लॉस 228 रुपयांवर वर खरेदी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे पेट्रोनेट एलएनजी रु.223 वर खरेदी करा आणि रु.234 चे लक्ष्य आणि रु.214 च्या स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

अनुज गुप्ता यांना HDFC बँक आणि श्री रेणुका शुगर्सवर इंट्राडे बाय रेटिंग दिले आहे. तुम्ही HDFC बँकेचे शेअर्स बाजारभावाने रु. 1700 चे लक्ष्य आणि रु. 1598 च्या स्टॉप लॉससह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.