अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवीन प्लॅन बाजारात आणत आहेत. लॉकडाउनच्या काळात इंटरनेटचा वाढता वापर पाहता अनेक नवनवीन स्कीम अनेक कंपन्यांनी बाजारात आणल्या आहेत.
बीएसएनएलनेही जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या आघाडीच्या खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी अनेक बदल स्वतःमध्ये केले आहेत.
परंतु सध्या जिओ, एअरटेल या दिग्गज कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा दिसत आहे. आता जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने आपल्या प्लॅन्समध्ये बदल केला असून या प्लॅन्समध्ये ग्राहकांना इंटरनेट डेटा आणि कॉलिंगच्या अनेक शानदार ऑफर देण्यात येत आहेत.
आता एअरटेलने 2 शानदार प्लॅन आणले आहेत. यातील पहिला आहे 249 रुपयांचा प्लॅन आणि दुसरा आहे 298 रुपयांचा प्लॅन. जर एअरटेल ग्राहकांनी 298 रुपयांचा प्रीपेड प्लॅन एअरटेल थँक्स अॅपवरुन रिचार्ज केला तर 50 रुपये डिस्काउंट मिळेल.
एअरटेलचा 249 रुपयांचा प्लॅन :- या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच 28 दिवस अनलिमिटेड कॉलचाही समावेश आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 100 एसएमएसही करता येणार आहेत.
एअरटेलचा 298 रुपयांचा प्लॅन :- 298 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटाची मर्यादा वाढली आहे. यात दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसचाही फायदा होणार आहे.
या प्लॅनमध्ये एअरटेल एक्सट्रीमचं आणि विंक म्यूजिकचं सब्सक्रिप्शन देखील मिळेल. तसेच 150 रुपयांच्या फास्टॅगचा कॅशबॅकही मिळेल.
एअरटेल थँक्स अॅपचा ‘असा’ घ्या फायदा :- एअरटेल ग्राहकांना एअरटेलचे थँक्स अॅप वापरून अधिकच फायदा मिळवता येणार आहे.
एअरटेल थँक्स अॅपवरुन रिचार्ज केल्यास ग्राहकांना 50 रुपयांची सूट आणि 2 जीबी अतिरिक्त डेटा मिळेल. म्हणजेच या प्लॅनची किंमत 248 रुपये होईल. विशेष म्हणजे यात अधिकचा 2 जीबी डेटाही मिळेल.