भारत

नवीन वर्ष 2025 मध्ये कमी खर्चात फिरायचे असेल तर ‘ही’ 3 ठिकाणी ठरतील फायद्याचे! इथले निसर्ग सौंदर्य मनाला पाडेल भुरळ

Published by
Ajay Patil

Budget Friendly Destination:- थोड्या दिवसांनी आता नवीन वर्षाचे आगमन होणार आहे व यानुषंगाने सगळेजण आता 2024 या वर्षाला निरोप देतील व येणाऱ्या 2025 या नवीन वर्षाचे स्वागत करतील. नवीन वर्ष म्हटले म्हणजे जीवनामध्ये अनेक नवीन गोष्टींची सुरुवात करण्याचा कालावधी किंवा एखादा नवीन संकल्प करून तो पूर्ण वर्षांमध्ये तडीस नेण्यासाठी केली गेलेली प्लॅनिंग इत्यादी सर्व गोष्टींसाठी नवीन वर्ष महत्त्वाचे असते.

तसेच बरेच व्यक्ती म्हणजेच ज्या व्यक्तींना पर्यटनाची हौस असते ते नवीन वर्षाच्या कालावधीमध्ये कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लान बनवतात. जेव्हा कुटुंब किंवा मित्र किंवा जोडीदारासोबत फिरायला जायचं प्लॅनिंग केला जातो तेव्हा सगळ्यात अगोदर बजेट फ्रेंडली ठिकाणे म्हणजेच कमीत कमी खर्चात आपल्याला फिरता येईल असे पर्याय शोधले जातात.

कारण कमी खर्चामध्ये आपल्याला उत्तम असे नैसर्गिक सौंदर्य किंवा ऐतिहासिक स्थळे इत्यादी गोष्टी पाहता याव्यात हा त्यामागचा उद्देश असतो.

अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील येणाऱ्या या नवीन वर्षाच्या कालावधीमध्ये जर कुठे फिरायला जायचा प्लॅनिंग बनवायचा असेल आणि तो ही बजेटमध्येच तर या लेखामध्ये आपण अशा काही तीन ठिकाणांची माहिती घेऊ ज्या ठिकाणी फिरण्यासाठी तुम्हाला कमीत कमी खर्च येतो.

नवीन वर्षामध्ये फिरायला जायचा प्लॅनिंग बनवायचा तर या तीन पर्यायांचा करा विचार

1- उदयपूर- राजस्थान राज्यातील उदयपूर हे एक उत्तम बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन असून या ठिकाणी असलेले शाही आकर्षण व परवडणाऱ्या प्रवासाचा अनुभव तुम्हाला घेता येतो. उदयपूर येथे असलेला पिचोला तलाव, सिटी पॅलेस आणि जैतासागर तलाव ही सुंदर ठिकाणे तुम्ही अगदी कमीत कमी खर्चात पाहू शकतात.

तसेच उदयपूर या ठिकाणी असलेली वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि उत्कृष्ट अशी पेये देखील तुम्हाला खूप कमी दरात उपलब्ध होतात. तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर या ठिकाणी असलेल्या स्थानिक बाजारपेठांमध्ये तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येते.

तसेच तुम्ही उदयपूरला फिरायला गेलात आणि तुम्हाला जर मुक्कामी थांबायचे आहे तर तुम्ही या शहराच्या मध्यभागी असलेल्या हॉटेल्स निवडली तर ती थोडी महाग होऊ शकते.

त्याऐवजी तुम्ही उदयपूर शहराच्या बाहेर असलेले रूम्स आणि गेस्ट हाऊस निवडले तर खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला उपलब्ध होतात. म्हणजे तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला राहण्याचा खर्च देखील करता येऊ शकतो.

2- ऋषिकेश- उत्तराखंड राज्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ऋषिकेश ओळखले जाते व अतिशय बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन म्हणून देखील ऋषिकेश प्रसिद्ध आहे. ऋषिकेश शहर हे गंगा नदीच्या काठावर वसलेले असून या ठिकाणी असलेले धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा अतिशय प्रसिद्ध आहे.

यासोबतच या ठिकाणी असलेले नैसर्गिक सौंदर्य आणि शांत व निसर्गरम्य वातावरण पर्यटकांमध्ये खास करून खूप लोकप्रिय आहे. या ठिकाणी असलेला लक्ष्मण झुला आणि त्रिवेणी घाट यासारख्या ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत व तुम्ही कमी खर्चात या ठिकाणांना भेट देऊन शांततेचा अनुभव घेऊ शकतात.

तसेच राहण्याकरिता ऋषिकेशला तुम्ही त्याठिकाणी असलेले कॅम्प आणि गेस्ट हाऊसचा पर्याय निवडू शकतात. जेणेकरून कमीत कमी खर्चामध्ये तुमची राहण्याची सोय या ठिकाणी होते.

3- अलेप्पी- अल्लेपी हे केरळ राज्यात असून ज्याला पूर्वचे व्हेनिस असे म्हटले जाते. दक्षिण भारतातील हे सर्वात सुंदर आणि बजेट फ्रेंडली असे ठिकाण आहे. या ठिकाणी मनमोहक बॅक वाटर तसेच शांत असा जलमार्ग आणि आकर्षक समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात.

तसेच या ठिकाणी तुम्ही पारंपारिक केरळ शिखरम बोटिंग राईडचा आनंद देखील घेऊ शकतात. जे एक अनोखा अनुभव देते आणि तेही अगदी कमीत कमी खर्चामध्ये.

तसंच केरळ राज्यातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ व ताजे सीफूड आणि त्या ठिकाणी मिळणारे स्थानिक खाद्यपदार्थ खवय्यांसाठी एक मेजवानी या ठिकाणी उपलब्ध होते व ते देखील कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही खाण्याचा आनंद या ठिकाणी घेऊ शकता.

Ajay Patil