अपयश आल्याने रतन टाटा निघाले होते कंपनी विकायला; पण तेथे झाला अपमान अन टाटांनी त्यानंतर केले शून्यातून विश्व् निर्माण , वाचा प्रेरणादायी प्रवास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-जगात वावरत असताना प्रत्येकालाच अपमानाचा सामना करावा लागतो. परंतु अनेक लोक या अपमानाने खचून जातात. परंतु असे काही लोक असतात जे यशामधून अपमानाचा बदला घेतात.

आपल्याकडे एक म्हण आहे , ‘यशापेक्षा मोठा कोणताही बदला नाही’ आणि प्रचिती करून दिली आहे टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी. यांच्या आयुष्यात घडलेली ही कथा खूपच प्रेरक आहे. रतन टाटा यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असताना त्यांचा एकदा खूप मोठा अपमान झाला.

या अपमानाची धग त्यांच्या मनात कायम होती. याचा बदला बोलून नाही तर आपल्या चांगल्या कृतीनं करून दाखवण्याचा त्यांनी निश्चय केला आणि त्यांनी संपूर्ण जगाला करून दाखवलं. तर ही कथा 1998 ची आहे जेव्हा रतन टाटांने आपली कार इंडिका लॉन्च केली होती. जो त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. तथापि, या कारने केलेल्या अपेक्षांची पूर्तता केली नाही आणि टाटा मोटर्सचे प्रचंड नुकसान झाले.

त्यानंतर समभागधारकांनी टाटा कंपनीचे शेअर्स विक्री करण्याची सूचना केली. नाईलाजास्तव रतन टाटा कंपनी विकण्याचा प्रस्ताव घेऊन अमेरिकेत फोर्ड मोटरच्या मुख्य ऑफिसमध्ये गेले. त्यांच्यासोबत कंपनीचे शेअर होल्डर्सही होते. फोर्ड कंपनीसोबत रतन टाटा यांची तीन तास मीटिंग चालली.

यादरम्यान, फोर्डच्या चेअरमनने रतन टाटा यांचा अपमान करत म्हटले की, ‘जर तुला व्यवसायाचं कोणतंही ज्ञान नव्हतं तर तू ही कार लॉन्च करण्यासाठी एवढा पैसा का गुंतवला. आम्ही तुझी कंपनी विकत घेऊन तुझ्यावर उपकार करत आहोत.’ या अपमानानंतर मीटिंग अर्ध्यावर सोडून ते भारतात परतले. यानंतर त्यांनी टाटा मोटर्स न विकण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी पुन्हा एकदा शुन्यापासून उभे केले आणि यावेळी कंपनीला प्रचंड नफा झाला. त्यानंतर रतन टाटा यांनी टाटा मोटर्सला खूप वेळ द्यायला सुरु केले. रतन टाटा यांनी आपल्या अपमानातून आलेल्या रागाला कामात झोकून दिल आणि त्याचा परिणाम असा झाला की काहीच वर्षात टाटा मोटर्स यशाचे शिखरं गाठायला लागले. आणि त्याच वेळेला बिल फोर्डची फोर्ड कंपनी अधोगतीला लागली होती.

हीच संधी साधत रतन टाटा यांनी बिल फोर्डला एक प्रोपजल पाठवलं. त्यात म्हंटल होत. ‘तुमच फेल मॉडेल आम्ही विकत घ्यायला तयार आहोत’.पण या वेळेस रतन टाटा डेट्रॉइट गेले नाहीत तर बिल फोर्ड त्याच्या टीमला घेऊन थेट मुंबईत आला आणि येऊन रतन टाटाला म्हणाला तुम्ही आमची ‘लँड रोव्हर’ आणि ‘जॅग्वार’ विकत घेऊन आमच्यावर खूप मोठे उपकार करत आहात.

अहमदनगर लाईव्ह 24