अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरियोग्राफर रेमो डिसूजा याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. त्याला उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्याच्या तब्येतीविषयी अधिक माहिती त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप मिळालेली नाही. त्याची अँजिओग्राफी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्रास होण्याआधी रेमोने ‘दिल ना तोडुंगा’ या गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते.
रेमो डिसूझा हा बॉलिवूडमधील दिग्गज कोरिओग्राफर आहे. त्याने आतापर्यंत अनेक बड्या चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन केलं आहे. 1995 मध्ये बॉलिवूडमध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली, त्यानंतर त्यांनी 2000 मध्ये दिल पे मत ले यार या चित्रपटात नृत्यदिग्दर्शन केले.
त्यानंतर त्यांनी आत्तापर्यंतच्या अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये नृत्य कोरिओग्राफ केले आहे. त्याला तहजीब, स्टुडंट ऑफ द इयर, ये जवानी है दिवानी, एबीसीडी 2, बाजीराव मस्तानी आणि कलंक या चित्रपटांसाठी गौरविण्यात आले आहे.
कोरिओग्राफीबरोबरच रेमोने गेल्या काही वर्षांपासून चित्रपट दिग्दर्शनातही पाऊल ठेवले आहे. फ्लाइंग जूट, रेस 3, सरप्लस, एबीसीडी, एबीसीडी 2 आणि स्ट्रीट डान्सर सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्याने केले आहे. याशिवाय तो अनेक रियलिटी शोजमध्येही दिसला आहे.