भारत

Business Idea : भन्नाट व्यवसाय! हा व्यवसाय करून दरमहा मिळतील 50 हजार रुपये, शेतकऱ्यांसाठी तर फायदेशीरच…

Published by
Ahmednagarlive24 Office

Business Idea : देशात कोरोना काळापासून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यातील अनेकजण व्यवसायकडे आणि शेतीकडे वळत आहे. ज्या लोकांकडे शेती आहे अशासाठी एक व्यवसाय आहे ज्यातून ते दरमहा ५० हजार रुपये कमावतील.

देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अधिक प्रयत्न केले जात आहेत. तसेच अनेक उपाययोजना देखील राबवल्या जात आहेत. पण सध्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळण्यासाठी कोणताही प्रयत्न केला जात नसल्याचे सध्या तरी दिसत नाही. मात्र शेतकऱ्यांनी जर शेती संबंधित व्यवसाय केला तर त्यांना त्यामधून चांगला नफा मिळू शकतो.

देशात सध्या फळांची मागणी जास्त आहे. जर तुम्ही फळे विकण्याचा व्यवसाय केला तर तुम्हाला चांगला नफा होईल. तसेच ज्यांच्याकडे शेती आहे अशा शेतकऱ्यांना तर जास्तच फायदा होईल.

फळांचा व्यवसाय

फळांचा व्यवसाय करणे खूप सोपे आहे. यासाठी जास्त भांडवल असण्याची आवश्यकता नाही. यासाठी तुम्ही मोठ्या मार्केटमधून फळे विकत घेऊन छोट्या बाजारात विकू शकता.

फळ व्यवसायासाठी जागा

गर्दीच्या ठिकाणी फळांचा व्यवसाय करावा, जिथे लोक येतात आणि जातात. फळांच्या दुकानासाठी बाजारपेठ हे सर्वोत्तम ठिकाण आहे. याशिवाय हॉस्पिटलजवळ, जिमजवळ, शाळा-कॉलेज, वसतिगृह अशा ठिकाणी फळांचे दुकानही उघडू शकता. या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात येतात आणि फळांची मागणीही येथे जास्त असते.

फळ व्यवसायात खर्च

जर तुम्ही एखाद्या गर्दीच्या ठिकाणी जागा घेऊन तुम्ही हा फळांचा व्यवसाय करू शकता. जर सुरुवातीला तुम्ही छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरु करू इच्छित असाल तर तुम्हाला 10 ते 20 हजार रुपये खर्च येईल. तसेच मोठ्या प्रमाणात व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला २ ते ३ लाख खर्च येईल.

फळ व्यवसायात नफा

फळांच्या व्यवसायामध्ये नफ्याची मर्यादा नाही. कधी थोडा कमी नफा मिळेल तर कधी जास्त. पण नफा कमी असो किंवा जास्त असो हा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर आहे आणि कधीही न थांबणार आहे. व्यवसायात तुम्ही 20,000 ते 50,000 पर्यंत कमवू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office