भारत

‘भारत बंद’ मध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांनी सामील होऊ नये !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- महाविकास आघाडीने पुकारलेल्या उद्याच्या भारत बंद मध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांनी सामील होऊ नये असे आवाहन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे यांनी केले आहे.

गेली दोन वर्षे कोरोनाने हैराण झालेल्या व्यापाऱ्यांना आत्ताशी कुठे पूर्ण वेळ दुकाने उघडी ठेवून व्यवसायाच्या माध्यमातून तोट्यात गेलेले व्यवसाय या सणासुदीच्या दिवसात मार्गी लागत असल्याचे दिसू लागले असताना

हा बंद व्यापाऱ्यांच्या मुळावर बसणार असून त्यांचे व्यवसाय वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडून तुम्ही राज्य शासन चालवणारे शासनकर्ते महाराष्ट्र बंद ठेवण्याचा हा बहुधा पहिलाच कटू प्रसंग असावा.

शेतकऱ्यांवर सतत अन्याय करणाऱ्या व सध्या देखील अनेक जिल्ह्यात तसेच पूर परिस्थिती असताना शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊन देखील या सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली नाही. आपल्या ही जिल्ह्यातील अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने कुठलीच नुकसान भरपाई तर दिलीच नाही.

उलट थकीत बिलांच्या पैशासाठी महावितरणच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे लाईट कनेक्शन कट करण्याचे काम चालू असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम चालू आहे.

म्हणून भारतीय जनता पार्टी च्या वतीने शेतकरी व व्यापारी यांना आवाहन करण्यात येते की कृपया या बंद मध्ये सामील न होता रोज या सरकारच्या मंत्र्यांवर होणारे

आरोप व भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर पडत असताना यावरील लक्ष हटवण्यासाठी केलेला हा बालिश प्रयत्न असुन त्यांनी या बंद मध्ये सामील न होता महा आघाडी सरकारचा निषेध करावा.

Ahmednagarlive24 Office