पिता-पुत्रावर कोरोना संसर्ग पसरवण्याचा गुन्हा दाखल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  बिहारच्या मधुबनीत ७३ वर्षांची व्यक्ती व त्याच्या मुलावर कोरोना संसर्ग पसरवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते दोघेही बाधित असून मुंबईतून बिहारला परतले आहेत.

मधुआ गावात राहणारे दोघे मुंबईत मजुरी करायचे व नुकतेच बिहार परतले आहेत. मुंबईतून येताना संसर्गाची लक्षणे दिसल्याने त्यांना कुशीनगरमध्ये थांबवण्यात आले.

त्यानंतर नमुने घेऊन त्यांना क्वाॅरंटाइन केंद्रात पाठवण्यात आले. मात्र ते तेथून पळून गेले व गावी आले. तेथे लोकांना व नातेवाइकांना भेटत राहिले. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कुशीनगर प्रशासनाने पश्चिम चंपारण प्रशासनाला माहिती दिली.

यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना बेतिया येथिल कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कुटुंबातील सदस्यांना मधुबनीतील क्वॉरंटाइन केंद्रात पाठवण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24