बाप म्हणाव कि सैतान ? पैशांसाठी चक्क एका महिन्याच्या बाळाला विकलं!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- एका महिन्याच्या पोटच्या बाळाला पित्याने ७०,००० रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी हैदराबाद शहरातून या बाळाची सुटका केली असून त्याची रवानगी बाल कल्याण विभागाकडे करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आपल्या बाळाला पतीनं विकल्याची तक्रार एका महिलेनं पोलिसांमध्ये दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत हैदराबाद पोलिसांनी बाळाची शोधमोहिम सुरु केली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी बाळाचा शोध घेतला असता त्यांना गुरुवारी एका ठिकाणी ते आढळून आलं.

या बाळाचे आईवडील फुटपाथवर राहतात. आपलं जीवन जगण्यासाठी ते छोटी-मोठी कामं करतात. भीकही मागतात असं पोलिसांनी सांगितलं आहे.पोलिसांनी सांगितलं की, एक सधन जोडपं फुटपाथवर राहणाऱ्या या कुटुंबाच्या जगण्याचं अनेक दिवसांपासून निरिक्षण करत होतं.

त्यानंतर, काही दिवसांनंतर या जोडप्याने बाळाच्या पित्याची रस्त्यावर भेट घेतली आणि बाळाच्या बदल्यात ७०,००० रुपयांची ऑफर दिली.याप्रकरणी जुवेनाईल जस्टिस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24