महानंद डेअरी हे महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण लेव्हलपर्यंत परिचित नाव. एकेकाळी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजे महानंदा डेअरी हे महाराष्ट्राचे वैभव मानले जायचे. आता हेच वैभव अखेर इतिहासजमा झाले असून गुजरातमधील मदर डेअरीने महानंद डेअरीवर ताबा मिळवला असल्याचे कन्फर्म झाले आहे.
महानंदच्या हस्तांतरणाची प्रक्रिया २ मे रोजीच पूर्ण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. ही डेअरी अमूल डेअरीला देण्यात येत असल्याचा आरोप करत महाराष्ट्राचे वैभव गुजरातच्या घशात घालण्याचा डाव आखला जातोय असा आरोप मागील काही दिवसांपूर्वी केला होता.
दरम्यान आता ही डेअरी गुजरातच्याच मदर डेअरी या ब्रँडला दिली गेलीये आणि विशेष म्हणजे या मदर डेअरीला राज्य सरकार २५३ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करेल अशीही माहिती मिळाली आहे.
गुजरातसाठी पायघड्या घालायचा म्हणून हा निर्णय?
दरम्यान आता यावरून चांगलेच राजकारण रंगेल असे दिसते. याचे कारण म्हणजे नुकतेच काही महिन्यानापूर्वी ‘महानंद’ नॅशनल डेअरी डेव्हलेपमेंट बोर्डाला चालवायला द्यायचा असा निर्णय घेतल्यानंतर व राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर राज्यातील इतर उद्योग राज्याबाहेर जात आहेतच
आता दूध व्यवसायही राज्याबाहेर चालवायला दिला जातोय. गुजरातसाठी पायघड्या घालण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप किसान महासभेने केला होता. आता हा मुद्दा आणखी जोर धरेल असे दिसते.
किती वर्षांसाठी व का झाला आहे हा करार ?
महानंदा डेअरी तोट्यात असल्याने राज्य सरकारच्या वतीने राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाला कळविण्यात आले. त्यानुसार राज्य सरकारने राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाशी करार करून महानंदा डेअरीचा ताबा घेतला.
हा करार एकूण पाच वर्षांसाठी करण्यात आला आहे. त्यामुळे ही डेअरी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या ताब्यात गेली आहे.