First Solar Eclipses 2023 : नवीन वर्ष सुरु होऊन ३ महिने उलटले आहेत. २०२३ या नवीन वर्षातील पहिले सूर्य ग्रहण या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात होणार आहे. २० एप्रिल रोजी हे सूर्य ग्रहण होणार आहे. या ग्रहणाचा काही राशींवर परिणाम दिसून येणार आहे.
२० एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या सूर्यग्रहणाचा वेळ गुरुवारी सकाळी 7.04 ते दुपारी 12.29 मिनिटे इतका आहे. सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 05 तास 24 मिनिटे आहे. हे सूर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहण असेल. मेष आणि अश्विनी नक्षत्रात हे घडेल.
या वर्षातील होणारे पहिले सूर्यग्रहण काही मोजक्याच देशांमध्ये पाहता येणार आहे. हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही. त्यामुळे या सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी भारतमध्ये वैध राहणार नाही.
जाणून घ्या सूर्यग्रहण कुठे वैध असेल
या महिन्यात २० एप्रिल रोजी होणारे सूर्य ग्रहण काही देशांमध्येच दिसणार आहे. परंतु वर्ष 2023 चे पहिले ग्रहण दक्षिण पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, हिंद महासागर आणि अंटार्क्टिकासह अनेक देशांमध्ये दिसणार आहे.
हे सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया, मलेशिया, जकार्ता, फिलीपिन्स आणि दक्षिण जपानच्या काही भागातूनही दिसणार आहे, परंतु दक्षिण पॅसिफिक, कंबोडिया, चीन, अमेरिका, सिंगापूर, थायलंड, अंटार्क्टिका या भागातून ते दिसणार नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या प्रदेशात ग्रहण दिसत आहे, त्या प्रदेशात सुतक देखील वैध असतो. भारतामध्येही हे ग्रहण दिसणार नसल्याने त्याचा सुतक कालावधी वैध ठरणार नाही.
सूर्यग्रहण कधी होते
सूर्यग्रहण कधी होते हे अनेकांना माहिती नसते. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मधून जातो तेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. यालाच सूर्यग्रहण म्हणतात. दरवर्षी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होते असते. जेव्हा अशी ग्रहणे होतात त्याचा परिणाम नक्कीच लोकांच्या जीवनावर परिणाम होत असतो.
ग्रहणाचे विशेष महत्त्व, मेष राशीवर प्रभाव
ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण हे खूप महत्वाचे मानले जाते. ग्रहणाच्या वेळी, सूर्य त्याच्या उच्च राशीत मेष राशीत असेल, जेथे त्याच्यासोबत बुध आणि राहू देखील उपस्थित असतील.
या ग्रहणाच्या केवळ 2 दिवसांनंतर देव गुरु राशी बदलतील, अशा स्थितीत पहिले सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे मानले जाते. ग्रहणाच्या वेळी सूर्य मेष आणि अश्विनी नक्षत्रात होत आहे, त्यामुळे मेष राशीच्या लोकांवर याचा जास्त प्रभाव पडेल.
राशिचक्र चिन्हांवर प्रभाव
वर्षातील होणारे हे पहिले सूर्य ग्रहण मेष, कन्या आणि सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले नाही. होणारे सूर्यग्रहण हे मेष राशीमध्ये होणार असल्याने या राशींवर अधिक परिणाम होणार आहे.
या सूर्यग्रहणाच्या वेळी मेष राशीच्या लोकांना सावधानता बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सिंह, कन्या, वृश्चिक आणि मकर राशीच्या लोकांवर सूर्यग्रहणाचा मोठा प्रभाव पडेल, तर वृषभ, मिथुन, धनु आणि मीन राशीच्या लोकांवर त्याचा प्रभाव शुभ राहील.
वृषभ, मिथुन, धनु आणि मीन राशीच्या लोकांवर चांगला सकारात्मक परिणाम होणार आहे. आर्थिक लाभ, पदोन्नती आणि नोकरीत यश मिळू शकते असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे.
कन्या राशीच्या लोकांवर देखील या प्रभाव दिसून येणार आहे. कन्या राशीच्या लोकांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी. यामुळे मानसिक तणाव आणि वेदना देखील होऊ शकतात.
तूळ राशींच्या लोकांवर देखील या सूर्यग्रहणाचा नकारात्मक प्रभाव होऊ शकतो. तूळ राशीच्या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात वादाची परिस्थिती टाळा आणि आरोग्याची काळजी घ्या.
सूर्यग्रहणाची तारीख
सूर्यग्रहण 2023 वेळ
सूर्यग्रहण तारीख – 20 एप्रिल
सूर्यग्रहण सुरू होते – सकाळी 07:05 पासून
ग्रहणाचा खग्रास -08:07 वाजता असेल आणि सूर्यग्रहणाचा मध्यभाग सकाळी 09:45 पर्यंत असेल.
ग्रहण संपेल – दुपारी १२:२९ वाजता
सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 05 तास 24 मिनिटे