अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी आयपीएलमधील आठ मालक संघातील खेळाडूंमध्ये ऑल स्टार सामना होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा सामना होईल.
मुख्य आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्याआधी तीन दिवस अगोदर हा सामना खेळला जाणार असून सामन्याचे ठिकाण निश्चित करण्यात आलेले नाही.
ऑल स्टार सामना दोन संघांमध्ये होईल. किंग्ज इलेव्हन पंजाब, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या उत्तर आणि पूर्व भारतामधील चार संघांचा मिळून एक संघ असेल.
दुसरा संघ दक्षिण आणि पश्चिम भागातील चार संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स या चार संघाचा एक संघ असेल. सोमवारी झालेल्या आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत या सामन्याबाबत निर्णय घेण्यात आला.