भारत

पाचशे रुपये सुट्टे करायला गेले अन चक्क 12 कोटींची लॉटरी जिंकले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  रातोरात नशीब पलटले… असे आपण आजवर ऐकले असलं मात्र हाच प्रत्यय केरळमधील एका व्यक्तीस आला आहे. केरळमधील सदानंदन ओलीपराम्बिल या व्यक्तीने तब्बल 12 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे.

हि लॉटरी जिंकण्याचा किस्सा जर तुम्ही ऐकाल तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल… रविवारच्या सकाळी सदानंदन भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडले. पण त्यांच्याकडे 500 रुपयांचे सुट्टे नव्हते.

यामुळे सदानंदन यांनी सेलवन नावाच्या एका स्थानिक लॉटरी विक्रेत्याकडून लॉटरीचे तिकीट (XG 21858) विकत घेतले. ते म्हणाले, मी मांसाच्या दुकानाकडे जाताना पाचशे रुपयांचे सुट्टे करण्याचा प्रयत्न करत होते.

पण त्यांना सुट्टे मिळाले नाही, म्हणून त्यांनी लॉटरीचे तिकीट विकत घेतले आणि दुपारी लॉटरीचा निकाल आल्यानंतर ते थक्क झाले. कारण काही तासांत ते ‘कोट्यधीश’ झालो होते, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता.

सदानंद यांना कर आणि लॉटरी एजंटचे कमिशन कापून सुमारे 7.39 कोटी रुपये मिळतील. केरळच्या लॉटरी विभागाने 47 लाखांहून अधिक तिकिटे विकली होती.

300 रुपये किमतीचे हे तिकीट कोट्टायम शहरातील बिजी वर्गीस या लॉटरी एजंटने कुडेमपाडीजवळील पांडवम येथील लॉटरी विक्रेता कुन्नेपरंबिल सेल्वन यांना विकले होते.

Ahmednagarlive24 Office