माजी कर्णधार सौरव गांगुलीची दुसऱ्यांदा अ‍ॅन्जिओप्लास्टी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची दुसऱ्यांदा अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली असून त्याच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये दोन स्टेंट लावण्यात आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच त्याची एक अ‍ॅन्जिओप्लास्टी झाली होती. मात्र, बुधवारी त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गेल्या 2 जानेवारीला जिम मारत असताना छातीत दुखू लागल्याने सोरव गांगुलीला वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तो पोच दिवस रुग्णालयात होता. यानंतर त्याला सात जानेवारीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती.

अहमदनगर लाईव्ह 24