भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्यानंतर कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार आज (2 जानेवारी) संध्याकाळी एन्जियोप्लास्टी करण्यात येणार आहे. घरामध्ये ट्रेड मिलवर व्यायाम करत असताना गांगुलीच्या छातीत दुखायला लागलं आणि त्याला चक्कर येऊ लागली आणि डोकं दुखू लागलं. दुपारी एक वाजता त्याला रुग्णालयात आणण्यात आलं होते.

दरम्यान गांगुलीला सौम्य असा हृदयविकाराचा झटका आला, तो योग्यवेळी रुग्णालयात आला. आता त्याची तब्येत स्थिर आणि चांगली आहे, असं वूडलॅन्ड्स रुग्णालयाचे डॉक्टर खान यांनी सांगितलं.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुलीला फोन करून त्याच्या तब्येतीविषयीची माहिती जाणून घेतली आहे. याशिवाय केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजूजू यांनीही डोना गांगुलीला फोन करून चौकशी केली.

अहमदनगर लाईव्ह 24