अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- रांची – खूंटीमधील काला माटीमध्ये चार अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना गुरुवारी समोर आली.
या सर्व 6 मुली मकर संक्रांतीनिमित्त रंग रोडी जत्रा पाहायला गेल्या होत्या. तिथून संध्याकाळी फूंदी या आपल्या गावाकडे येत होत्या. वाटेत आरोपींनी मुलींना पकडले, यादरम्यान दोन मुलींनी तेथून पळ काढला.
इतर चार मुलींना घेऊन आरोपी हातूदामी गाबात गेले. तिथे एका घरात आरोपींनी मुलींवर सामुहिक बलात्कार केला. घटना खूंटी जिल्ह्यातील हादूतामी गावातील आहे.
मुलींचे वय 12 ते 15 वर्षांच्या दरम्यान आहे आणि सर्व पाचवी ते सातवी अशा वर्गात शिकतात. पीडित मुलींनी सांगितले की, त्या सर्व जत्रा पाहून घराकडे परत येत होत्या.
स्त्यात गाडीवर 6 मुले आली आणि त्यांना घेऊन गेले. यापैकी एक आरोपी मुलींच्या वर्गातील आहे, तर इतर आरोपींची ओळख अजून पटली नाही.
दरम्यान पोलिसांनी पीडित मुलींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.