Free OTT Platforms : भारतात OTT प्लॅटफॉर्मची क्रेझ दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पण ग्राहकांना OTT प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतात. त्यामुळे रिचार्जव्यतिरिक्त ग्राहकांना जास्तीचे पैसे भरावे लागत आहेत. पण आता OTT प्लॅटफॉर्मसाठी पैसे भरण्याची गरज नाही.
बाजारात सध्या Netflix, Amazon Prime Video, Disney + Hotstar, G5 सारखे अनेक OTT प्लॅटफॉर्म आहेत. OTT प्लॅटफॉर्मसाठी बाजारात स्पर्धा असूनही त्याचे शुल्क देखील खूपच आहे. पण आता ग्राहकांना ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी वेगळे पैसे खर्च करण्याची काहीही गरज नाही.
एरटेल कंपनीकडून ग्राहकांना रिचार्ज प्लॅनवर मोफत नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि डिस्ने + हॉटस्टार सदस्यता दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पैशांची बचत होत आहे.
नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि डिस्ने + हॉटस्टार सदस्यता विनामूल्य उपलब्ध असेल
बाजारात OTT प्लॅटफॉर्मचे सदस्यता घेण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागत आहे. नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमची सदस्यता मिळवण्यासाठी ग्राहकांना इतर OTT प्लॅटफॉर्मपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
जर तुम्हालाही OTT प्लॅटफॉर्मची सदस्यता घेईची असेल तर आता पैसे भरण्याची काहीही गरज नाही. कारण आता टेलिकॉम कंपन्यांकडून OTT प्लॅटफॉर्मची सदस्यता मोफत दिली जात आहे.
ही ऑफर एअरटेल पोस्टपेड ग्राहकांसाठी आहे.
टेलिकॉम कंपनी एअरटेलने त्यांच्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. रिचार्ज प्लॅनवर ग्राहकांना आता मोफत OTT प्लॅटफॉर्म दिले जात आहे. 1199 रुपयांच्या प्लॅनवर एक महिन्याचे बेसिक नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन, 6 महिन्यांचे Amazon प्राइम मेंबरशिप आणि 1 वर्षाचे Disney + Hotstar सबस्क्रिप्शन मोफत मिळेल.
Netflix सदस्यत्व अधिक पैसे देऊन अपग्रेड केले जाऊ शकते
जर तुम्हाला नेटफ्लिक्सच्या सबस्क्रिप्शनची मुदत वाढवायची असेल तर तुम्ही दरमहा ३०० रुपये भरून त्याची मुदत वाढवू शकता. याशिवाय तुम्ही 450 रुपये प्रति महिना भरून नेटफ्लिक्स प्रीमियमचा आनंद घेऊ शकता. एअरटेलच्या या 1199 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉल, दररोज 100 एसएमएस, 240 जीबी मासिक डेटा देखील मिळेल.