Categories: भारत

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या युवतीवर सामूहिक बलात्कार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 : लॉकडाऊनमुळे राजस्थानच्या सवाईमाधोपूर जिल्ह्यात अडकलेली एक महिला गुरुवारी जयपूरला जाण्यासाठी पायी निघाली होती. रात्री उशीर झाल्याने ती वाटेतच एक शाळेमध्ये मुक्कामास थांबली.

रात्री दोन वाजता महिलेला एकटे पाहून तीन तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी (शुक्रवार) पीडितेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

एसपी सुधीर चौधरी यांनी सांगितले की, अजमेर जिल्ह्यातील किशनगड पोलिस स्टेशनच्या भागात राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेने शुक्रवारी बटोदा पोलिस स्टेशन, सवाईमाधोपूर तक्रार दाखल केली.

त्यात तिने सांगितले की लॉकडाऊनमुळे ती एक महिन्यापासून सवाई माधोपूर जिल्ह्यात अडकली होती. गुरुवारी सवाई माधोपूर ते जयपूरकडे पायी गेली.

वाटेत रास्ता चुकल्याने ती बैरखण्डी गावात पोहोचली. रात्र झाल्याने ती गावातील शाळेत थांबली. एसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री २ च्या सुमारास कमल खारवाल, लखन रैगर व रिषिकेश मीना हे तिन्ही आरोपी शाळेत पोहोचले.

तिथे पीडितेवर अत्याचार केला व फरार झाले. घटनेनंतर पीडितेने बाटोदा पोलिस ठाणे गाठले. यानंतर सीताराम मीणा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपींना अटक केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24