‘थेट गरीबांच्या खात्यात आर्थिक मदत द्या’..या अर्थतज्ञाचा सल्ला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाउनमुळे आर्थिक व्यवस्थाच कोलमडली आहे. हातावर पोट असलेल्यांना मोठ्या प्रमाणात या संकटाचा सामना करावा लागत आहे.

त्याचप्रमाणे छोटे मोठे व्यवसाय, उद्योग अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने थेट गरीबांच्या खात्यात १ हजार रुपये टाकावे असे मत अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केलं.

अभिजित बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी इस्टर डुफ्लो या जयपूरमधील ऑनलाइन लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या होत्या. “करोनाच्या संकटकाळादरम्यान सरकारला प्रत्येक भारतीला किमान १ हजार रुपये त्वरित दिले पाहिजे.

तसंच पुढील काही महिने सरकारनं ही रक्कम भारतीयांना दिली पाहिजे,” असं मत त्यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केलं. तसंच ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ ही योजनादेखील सरकारानं लवकरात लवकर लागू केली पाहिजे,

असंही त्यांनी नमूद केलं. भारतीय अर्थव्यवस्थेपुढे १९९१ पेक्षाही अधिक कठिण संकट उभं राहू शकतं असं मत बॅनर्जी यांनी यापूर्वी व्यक्त केलं होतं. तसंच त्यांनी जीडीपीमध्येही मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे.

सरकारला सद्यस्थितीत गरीबांच्या हाती पैसा कसा पोहोचवता येईल याबाबत विचार करायला हवा, असंही त्यांनी नमूद केलं. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी मागणी वाढवण्याची गरज आहे.

मागणी तेव्हाच वाढेल जेव्हा लोकांमध्ये खरेदी करण्याची क्षमताही वाढेल. यासाठीच लोकांच्या हाती पैसा पोहोचवणं आवश्यक आहे.

लोकांच्या हाती पैसा आला तरच ते खर्च करतील आणि खर्च केल्यानंच मागणी वाढेल, तसंच अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असंही बॅनर्जी म्हणाले

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24