अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढल्यामुळे भारतातही सोने आणि चांदीच्या दरात सोमवारी मोठी वाढ झाली.
सोमवारी एमसीएक्स मध्ये सोन्याच्या दरांमध्ये 1.23 टक्क्यांनी वाढ झाली. परिणामी हे दर 50,860 रुपये प्रति दहा ग्रामवर पोहोचले.
तर, चांदीचे दर 2.21 टक्क्यांनी वाढल्यामुळं 1504 रुपयांनी ही वाढ होत दर 69,627 रुपये प्रति दहा ग्राम वर पोहोचले. रुपयाच्या तुलनेत डॉलर घसरला असल्याने त्याचा सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम झाला आहे.
तसंच जगभरात कोरोना व्हायरस रुग्णांमध्येही वाढ होत असल्याने सोन्या-चांदीचे भाव वाढले आहेत. तसंच अमेरिकेत मोठ्या मदत पॅकेजच्या चर्चेमुळेही मौल्यवान धातूच्या किंमतीवर परिणाम झाला आहे.