Gold Price Today: देशात आता लग्नसराईचा हंगाम सुरु झाला आहे. यामुळे आता बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे.
यातच तुम्ही देखील तुमच्यासाठी सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता सोने स्वस्तात खरेदी करू शकतात याचा मुख्य कारण म्हणजे येणाऱ्या काही दिवसात सोने पुन्हा एकदा महाग होण्याची शक्यता आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या शुक्रवारी बाजारात 24 कॅरेट सोने 60,169 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकली जात होती.
IBJA नुसार सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 346 रुपयांनी घसरून 60,169 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. गुरुवारी सोने 84 रुपयांनी महागले आणि 60515 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवले गेले. बाजारात चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे चांदी 481 रुपयांच्या घसरणीनंतर 73934 रुपये प्रति किलोच्या पातळीवर ट्रेंड करताना दिसत आहे.
देशातील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 60382 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. यासोबतच 23 कॅरेट सोन्याचा दर 60140 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेंड करताना दिसला. यासोबतच 22 कॅरेट सोने 55310 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले गेले. बाजारात 18 कॅरेट सोन्याचा भाव 45287 रुपये प्रति तोळा राहिला. याशिवाय 14 कॅरेट सोने 35324 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले गेले.
देशाची राजधानी दिल्लीत तुम्ही सहज सोने खरेदी करून घरी आणू शकता. दिल्ली सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 55900 रुपयांवर आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 55,750 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,820 रुपये होता.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 55750 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला. याशिवाय येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 60820 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिला.
हे पण वाचा :- Chandra Grahan 2023: 5 मे रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण, गर्भवती महिलांनी काळजी घ्या, ‘या’ चुका अजिबात करू नका!