Gold Price Update : देशात सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे या दिवसांत अनेकजण सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ झाल्याने दरही गगनाला भिडले होते. मात्र सध्या उच्चांकापेक्षा सोने आणि चांदी स्वस्त मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी सोने आणि चांदीच्या वाढत्या दरांनी आजपर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक गाठला होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करणे न परवडण्यासारखे झाले होते. मात्र उच्चांक दरापेक्षा सध्या सोने आणि चांदी स्वस्त मिळत आहे.
मंगळवारी महावीर जयंती असल्याने सराफा बाजार बंद होता. सराफा बाजार बंद असल्याने सोने आणि चांदीचे नवीनतम दर जाहीर होऊ शकले नाहीत. सोमवारी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली तर चांदीच्या किमतीमध्ये वाढ झाली.
सध्या 24 कॅरेट सोने 59715 रुपयांना मिळत आहे. तर चांदी 71700 रुपये किलो दराने विकली जात आहे. आता ग्राहकांना वाढत्या दराने सोने आणि चांदी खरेदी करावी लागत आहे.
सोमवारी सोन्याच्या दरात 10 रुपयांची घसरण पाहायला मिळाली तर चांदीच्या दरात 118 रुपयांची दर वाढ दिसून आली. त्यामुळे ग्राहकांना काही दिलासा न मिळाल्याचे दिसत आहे.
नवीनतम 14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर
सोमवारी 24 कॅरेट सोने 36 रुपयांनी स्वस्त होऊन 59715 रुपये झाले, 23 कॅरेट सोने 36 रुपयांनी स्वस्त होऊन 59476 रुपये झाले, 22 कॅरेट सोने 33 रुपयांनी स्वस्त होऊन 54699 रुपये झाले, 18 कॅरेट सोने 27 रुपयांनी स्वस्त होऊन 44786 रुपये आणि 14 कॅरेट सोने 21 रुपयांनी स्वस्त होऊन 34933 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचले आहे.
तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करायचे असेल तर तुम्ही 14 कॅरेट सोने खरेदी करू शकता. कारण १४ कॅरेट सोन्याचे दर सध्या 34933 रुपये सुरु आहेत. त्यामुळे हेच सोने स्वस्त मिळत आहे.
अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या
सोने आणि चांदी खरेदी करत असताना नेहमी काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुमची सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करत असताना फसवणूक केली जाऊ शकते. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी सरकारने एक ॲप बनवलं आहे.
बीआयएस केअर ॲपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या ॲपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.