अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-25 जानेवारी 2021 रोजी दिल्ली बुलियन बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 141 रुपयांची घट झाली, या घटीमुळे सोन्याचा भाव 48,509 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
गेल्या सत्रात सोने 48,650 रुपये प्रति 10 ग्रॅमवर भाव बंद झाला होता. मात्र चांदीच्या भावात आज किंचित वाढ झाली. आज चांदीमध्ये केवळ 43 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली.
या वाढीमुळे चांदीची किंमत 66,019 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. गेल्या सत्रात चांदी 65,976 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे मूल्य तेजीसह 1,853.26 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. तर चांदींची किंमत 25.55 डॉलर प्रति औंसवर तेजीसह ट्रेंड करत होती.
दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्यामुळे भारतीय बाजारावरही परिणाम झाला. तसेच कोरोना लसीचे वितरण आणि लसीकरण मोहिमेतील तेजी यामुळे मौल्यवान धातूंच्या किंमतींवरही परिणाम होत आहे.