सर्वसामान्यांसाठी एक खुशखबर आहे.आता सर्वसामान्यांना लष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. ‘टूर ऑफ ड्युटी’अंतर्गत सामान्य लोकांना लष्करात तीन वर्षे नोकरी करण्याची संधी मिळेल.
केंद्र सरकार यावर विचार करत आहे. केंद्र सरकार यासाठी नियमात बदल करण्याच्या तयारीत असून असे झाल्यास लष्करात पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीसाठी नोकरी दिली जाईल.
भारतीय लष्करात सद्यस्थितीला ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’अंतर्गत किमान 10 वर्ष नोकरी करण्यात येते. अधिकारी पदावर कार्यरत व्यक्तीला 10 वर्षांचा कालावधी संपल्यावर आणखी 4 वर्ष सेवा बजावता येते.
परंतु नव्या ‘टूर ऑफ ड्युटी’संकल्पनेअंतर्गत 3 वर्ष नोकरी करत येईल. तसेच यामुळे तरुणांना सैन्याकडे आकर्षित करता येईल.
लष्कराच्या प्रवक्त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना अशा एका प्रस्तावावर विचार सुरू असल्याचे सांगितले.
ज्याद्वारे सामान्य लोकांना लष्करात नोकरी करून देशसेवा बजावत येईल. ‘टूर ऑफ ड्युटी’अंतर्गत सामान्य लोकांना लष्करात तीन वर्षे नोकरी करण्याची संधी मिळेल.