भारत

Petrol Diesel Price 11 March 2023 : खुशखबर! कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे नवीनतम दर…

Published by
Ahmednagarlive24 Office

Petrol Diesel Price 11 March 2023 : देशात दिवसेंदिवस इंधनाच्या किमती वाढत चालल्या आहेत. पण सध्या वाढत्या इंधनाच्या किमतीला ब्रेक लागला आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किमती घसरल्या आहेत. आजही क्रूड ऑइल स्वस्त झाले आहे.

भारतीय तेल कंपन्यांनी इंधनाच्या किमती जाहीर केल्या आहेत. 11 मार्च 2023 साठी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या आहेत. आज सर्वसामान्यांसाठी इंधनाच्या किमतीबाबत आनंदाची बातमी आहे.

भारतीय तेल कंपन्यांनी आज सलग २९१व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना एकप्रकारचा दिलासा मानला जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरत आहेत. या घसरणीनंतर डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $ 75.42 आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 81.56 च्या जवळ पोहोचले आहे.

देशातील मुख्य शहरातील पेट्रोल- डिझेल दर

देशातील प्रत्येक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. पेट्रोलचे आणि डिझेलचे दर शंभरी पार गेल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ बसत आहे. तसेच इंधनाच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊन सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत.

मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
दिल्ली- पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता – पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेल दर सोप्या पद्धतीने जाणून घ्या

भारतीय तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले जातात. सकाळी ६ वाजता हे दर जाहीर होतात. जर तुम्हालाही नवीन दर जाणून घेईचे असतील तर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक शहर कोडसह RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि BPCL ग्राहक 9223112222 वर RSP पाठवू शकतात. तर, HPCL ग्राहक HP Price 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Ahmednagarlive24 Office