Senior Citizen Pension : खुशखबर! केंद्र सरकारची ज्येष्ठ नागरिकांना मोठी भेट, दरमहा मिळणार 18500 रुपये पेन्शन…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Senior Citizen Pension : केंद्र सरकारकडून देशातील कमर्चारी आणि निवृत्तीधारकांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा देशातील लाखो नागरिकांना फायदा होत आहे. केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री वय वंदना योजना आणली आहे.

प्रधानमंत्री वय वंदना योजनेद्वारे दरमहा ज्येष्ठ नागरिकांना 18500 रुपयांपर्यंत पेन्शन दिली जात आहे. लवकरच ही योजना सरकारकडून बंद केली जाणार आहे. ही योजना बंद होण्यापूर्वी यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून फायदा मिळवू शकता.

26 मे 2020 रोजी प्रधानमंत्री वय वंदना योजना सरकारने सुरु केली होती. आता ही योजना ३१ मार्च २०२३ नंतर बंद होणार आहे. तोपर्यंत या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता.

एलआयसी प्रधानमंत्री वय वंदना योजना चालवली जाते

सरकारी भारतीय विमा कंपनी एलआयसीकडून ही योजना चालवली जात आहे. त्यामुळे या योजनेत कोणतीही जोखीम नाही. पती-पत्नी दोघांनी वयाची 60 वर्षे ओलांडली असतील तर ते एकत्र दुप्पट गुंतवणूक करू शकतात.

दरमहा 18500 पेन्शन कशी मिळेल?

जर विवाहित जोडप्याने या योजनेत १५ लाखांची गुंतवणूक केली तर त्यांचे एकूण ३० लाख होतील. योजनेवर वार्षिक ७.४० टक्के व्याज दिले जात आहे. गुंतवणुकीवर तुमचे वार्षिक व्याज रु. 222000 असेल. जेव्हा ते 12 महिन्यांत विभागले जाते तेव्हा ते 18500 रुपये होईल. हे तुम्हाला दरमहा पेन्शन म्हणून मिळेल.

जर या योजनेमध्ये एका व्यक्तीला गुंतवणूक करायची असेल तर १५ लाखांची गुंतवणूक करू शकतात. त्यांच्या या गुंतवणुकीवर 111000 रुपये वार्षिक व्याज मिळू शकते. तसेच 9250 रुपये मासिक पेन्शन मिळेल.