अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली टाटा नॅनो बाजारात आली आणि सर्वसामान्यांचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले. आता ही नॅनो कार इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये समोर येणार आहे.
नुकतीच टाटा नॅनोची इलेक्ट्रिक व्हर्जन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Jayem Neo ला टेस्टिंग दरम्यान स्पॉट केले गेले. आता तुम्ही विचार कराल की Jayem Neo म्हणजे काय? सुमारे तीन वर्षांपूर्वी नोव्हेंबर 2017 मध्ये टाटा मोटर्सने Jayem Automotivesच्या भागीदारीत टाटा नॅनोची इलेक्ट्रिक आवृत्ती बाजारात आणण्याची घोषणा केली होती.
Jayem Neo ब्रँडच्या अंतर्गत कार बाजारात आणण्याची योजना होती. मीडिया रिपोर्टनुसार ओला इलेक्ट्रिकच्या ताफ्यात ही गाडी बाजारात आणण्याची योजना होती. परंतु, बऱ्याच वर्षानंतर या कारचे उत्पादन आणि तयारी याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. आता रशलेनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चाचणीच्या वेळी निओ इलेक्ट्रिक कार पुण्यात स्पॉट झाली आहे.
या घोषणेनंतर जवळपास तीन वर्षांनंतर टाटा नॅनो इलेक्ट्रिक ना केवळ फ्लीट ऑपरेटर्ससाठी तर खासगी कार म्हणून देखील लॉन्च करण्यात आली. नव्या अहवालानुसार टाटा नॅनो इलेक्ट्रिकमध्ये 17.7 किलोवॅट क्षमतेची 48 व्होल्टची इलेक्ट्रिक मोटर वापरली गेली आहे.
ह्या मोटरला इलेक्ट्रा ईव्हीद्वारे सप्लाय केला गेला आहे. त्याच कंपनीने टियागो आणि टिगोरसाठी इलेक्ट्रिक मोटर्स देखील पुरविल्या. तथापि, दोन कंपन्यांच्या ओरिजनल एग्रीमेंटनुसार टाटा मोटर्सला कारचे बॉडी पॅनेल Jayem ला पुरवायचे होते आणि कोयंबटूरस्थित कंपनीला इलेक्ट्रिक मोटर्स बसवाव्या लागतील.
ड्रायव्हिंग रेंज कशी असेल ? :- आता ही गाडी टाटा नॅनोच्या नावाने लॉन्च होईल की Jayem Neoच्या नावाने लॉन्च होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. रिपोर्ट्सनुसार या कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, फ्रंट सीटसाठी बेल्ट रिमाइंडर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर असेल.
या कारची टॉप स्पीड ताशी 85 किलोमीटर असेल आणि ही कार सिंगल चार्जमध्ये 203 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. याशिवाय ही कार एसी आणि 4 प्रौढांसमवेत सुमारे 140 किलोमीटरचा प्रवास करते. तथापि, कंपनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.