क्रिकेटप्रेमींना खुशखबर! BCCI क्रिकेटरांना उतरवणार मैदानात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी दिल्ली कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केले व त्याचा परिणाम सर्वच घटकांना भोगावा लागला. खेळाडूही यापासून बचावले नाही. सर्व क्रिकेट स्पर्धा सध्या रद्द करण्यात आल्या आहेत.

चाहत्यांनीही आपल्या आवडत्या प्लेयरसना आणि सामन्यांना पाहून खूप कालावधी लोटलाय. आता बीसीसीआयच्या वतीनं खेळाडूंना पुन्हा मैदानावर आणण्यासाठी एक प्लॅन तयार केला आहे.

बीसीसीआयचे सचिन जय शाह यांनी चार टप्प्यात भारतीय संघ पुन्हा मैदानात कसा उतरेल, यासाठी तयारी केली आहे. यामध्ये 4 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये टीम इंडियाला पुन्हा मैदानात उतरवले जाऊ शकते.

पहिला टप्पा- लॉकडाऊनमध्ये बीसीसीआयच्या वतीनं खेळाडूंकडे एक प्रश्नावली भरून घेतली आहे. ज्यामध्ये त्यांच्याकडे कोणत्या सुविधा आहेत, याची माहिती घेण्यात आली.

टीम इंडियाचे फिजियोथेरेपिस्‍ट नितिन पटेल आणि ट्रेनर निक बेव यांना खेळाडूंशी जोडण्यात आले आहे. फलंदाज आणि गोलंदाज यांचा रोज एक सेशन कोचसोबत करावे लागते.

मुख्य कोच रवी शास्त्रीही खेळाडूंवर नजर ठेवून आहेत. दुसरा टप्पा-लॉकडाऊन हटवण्यात आल्यानंतर काही बदल केले जाऊ शकतात.

खेळाडूंना गटा-गटांमध्ये मैदानावर पाठवले जाऊ शकते. तिसरा टप्पा-बीसीसीआय सध्या खेळाडूंसाठी खास सुविधा तयार करत आहे.

यासाठी सध्या एक ब्लूप्रिंट तयार केली जात आहे. लॉकडाऊन हटवल्यानंर एक प्रोग्राम जारी केला जाईल. चौथा टप्पा-क्रिकेट पुन्हा सुरू करण्याआधी बीसीसीआय खेळाडूंच्या फिटनेस आणि मानसिकतेवर विशेष काम करणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24