भारत

Animal husbandry subsidy : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पशुसंवर्धनासाठी सरकार देत आहे 90% अनुदान, आजच घ्या योजनेचा लाभ

Published by
Ahmednagarlive24 Office

Animal husbandry subsidy : मोदी सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. तसेच शेतीला हातभार लागावा यासाठी अनेक योजनांद्वारे अनुदान देखील दिले जात आहे. जर तुम्ही पशुसंवर्धन व्यवसाय करू इच्छित असाल तर तुम्हाला यावर 90% अनुदान दिले जात आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी सरकारकडून अनेक प्रकारे मदत केली जात आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकडून अनेक प्रकारे प्रयत्न केले जात आहेत.

ग्रामीण भागातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून अनेक छोटे मोठे व्यवसाय करत असतात. यामध्ये प्रामुख्याने पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात शेतकरी करत आहेत. पशुपालनावरच सरकारकडून 90% अनुदान दिले जात आहे.

शासन विविध योजना राबवत आहे

खेड्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक हातभ लागावा यासाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान योजना सुरु करण्यात आली आहे. तसेच आता पशुपालन व्यवसाय करण्यासाठी अनुदान देखील दिले जात आहे.

ग्रामीण भागातील लोकांना हा व्यवसाय करता यावा यासाठी सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान, राष्ट्रीय गोकुळ मिशन, पशु शेतकरी क्रेडिट कार्ड आणि पशुधन विमा योजना अशा अनेक योजना राबविल्या आहेत, ज्याद्वारे शेतकरी आणि पशुपालकांना आर्थिक मदत मिळू शकते आणि त्यांची वाढ वाढू शकते.

सरकार ९० टक्के खर्च देत आहे

मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक मदत आणि रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये सरकारकडून गाई-म्हशी संवर्धनसाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे.

दुभत्या गाई आणि म्हशी खरेदी करण्यासाठी सरकारकडून 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे. राहिलेली १० टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतः खर्च करावी लागणार आहे. याबद्दल सरकारकडून एक ट्विट करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office