भारत

PM Kisan : पीएम किसान लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! मोदी सरकार शेतकऱ्यांना आता 6 हजार नाही तर देणार 8 हजार रुपये…

Published by
Ahmednagarlive24 Office

PM Kisan : देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना शेतीला आर्थिक हातभार लावण्यासाठी काही पैसे दिले जातात. मात्र लवकरच या योजनेची रक्कम वाढवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

लोकसभा निवडणूक एका वर्षावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले जाऊ शकतात. पीएम किसान योजनेची रक्कम वाढवल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात अधिक रक्कम येऊ शकते.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सध्या ६ हजार रुपये वर्षभरात दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांना हफ्त्यातून दिले जातात. मात्र आता शेतकऱ्यांना ६ नाही तर ८ हजार रुपये दिले जाणार आहेत.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र योजनेत सुधारणा करण्यासाठी कृषी मंत्रालयाकडून पंतप्रधान कार्यालयाला शिफारस करण्यात आली आहे.

या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षातून ३ वेळा पाठवले जातात. तर आता रक्कम वाढवली तर ४ हफ्त्यांमध्ये हे पैसे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील.

सरकारला रक्कम का वाढवायची आहे?

गेल्या वर्षी 2022 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातही पंतप्रधान किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. पण त्यानंतर सरकारने कोरोना महामारीच्या काळात देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी इतर उपाययोजनांवर आग्रह धरला.

मात्र गेल्या वर्षभरात कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे, खते, कीटकनाशके, कृषी यंत्रसामग्री आदी खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असून त्यांचे भाव वाढले आहेत. हे लक्षात घेऊन सरकारला शेतकऱ्यांना मदत करणारी योजना अधिक चांगल्या पद्धतीने मांडायची आहे.

शेतकऱ्यांच्या मोठ्या कामासाठी पीएम किसान

PM किसान निधी देशातील शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. याद्वारे शेतकरी खते, बियाणे, कीटकनाशके आणि खते इत्यादींच्या गरजा भागवतात. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 12 हप्ते प्राप्त झाले आहेत.

त्याचा 13 वा हप्ता 25 जानेवारी रोजी जारी केला जाऊ शकतो, ज्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. सरकारच्या या योजनेचा देशातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

Ahmednagarlive24 Office