Ration Card News : रेशनकार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार वाढीव रेशन; जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card News : तुम्हीही रेशनकार्डधारक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता सरकारकडून वाढीव रेशन दिले जाणार आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांचा मोठा फायदा होणार आहे. आता वाढीव गहू आणि तांदूळ दिला जाणार आहे.

केंद्र सरकारकडून २०२४ पर्यंत मोफत धान्य दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे देशातील रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना काळापासून सरकारकडून मोफत धान्य वाटप केले जात आहे.

सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

हिमाचल सरकारकडून आता शिधापत्रिकाधारकांना अतिरिक्त धान्य दिले जाणार आहे. आता १ किलो तांदूळ जास्त दिले जाणार आहे. जर तुमच्याकडे एपीएल कार्ड असेल तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. एपीएल कार्डधारकांना सरकारकडून मोठा लाभ दिला जात आहे.

यापूर्वी हिमाचलमध्ये बीपीएल कार्डधारकांना 7 किलो तांदूळ वितरित केले जात होते, परंतु आता ते 8 किलो करण्यात आले आहे. याचा फायदा अनेक शिधापत्रिकाधारकांना होणार आहे. राज्यातील सुमारे 12 लाख लोकांना प्रतिकिलो 10 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

वाढीव गहू आणि तांदूळ मिळणार

तांदळाचा कोटा वाढवण्याबरोबरच गव्हाचा कोटाही वाढवण्यात आला आहे. यापूर्वी शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिकाधारकास ७ किलो तांदूळ व १३ किलो गहू दिले जात होते.

आता पुन्हा एकदा कोटा वाढवण्यात आला आहे. आता शिधापत्रिकाधारकांना 8 किलो तांदळासोबत 15 किलो गहू उपलब्ध करून दिले जाणार आहे. या महिन्यापासून रेशन डेपोमध्ये ग्राहकांना तांदूळ आणि गहू देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अनुदानावरील अतिरिक्त धान्याचा लाभ

एवढेच नाही तर राज्य सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना 4 पैकी 3 डाळही उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासोबतच 2 लिटर तेल, साखर आणि 1 किलो मीठ यावर राज्य सरकारकडून अनुदान दिले जात आहे.

हरियाणा उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले की, नागरिक संसाधन माहिती विभागाने दिलेल्या आकडेवारीच्या आधारे 841000 कुटुंबे गुलाबी कार्डसाठी अपात्र असल्याचे आढळून आले आहे.

डिसेंबर 2022 मध्ये या कुटुंबांच्या शिधापत्रिका बंद झाल्यामुळे जानेवारी 2023 महिन्याचे रेशन उपलब्ध झाले नाही. तथापि, उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की जानेवारी 2022 मध्ये 26.94 लाख कुटुंबांच्या तुलनेत जानेवारी 2023 मध्ये 31.59 लाख बीपीएल, AAY कुटुंबांना रेशनचे वाटप करण्यात आले आहे.

देशातील 80 कोटी लोकांना मोफत रेशनचा लाभ मिळत आहे

कोरोना काळापासून देशातील ८० कोटी नागरिकांना मोफत धान्याचा लाभ मिळत आहे. तसेच २०२४ पर्यंत मोफत धन्य वाटप केले जाणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. जे नागरिक अपात्र आहेत अशा नागरिकांचे रेशनकार्ड रद्द केले जाणार आहे.