खुशखबर ! टोल नाक्यांपासून सुटका मिळणार; गडकरींची घोषणा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-पुढच्या दोन वर्षांमध्ये भारताला टोल नाक्यांपासून मुक्ती देणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. रशियाच्या मदतीने केंद्र सरकार Global Positioning System (GPS) टेक्नोलॉजी वापर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं टोल उत्पन्न 1 लाख 34 हजार 000 कोटींपर्यंत वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या संबंधित विभागांच्या बैठकीनंतर नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.

पुढील 2 वर्षांत वाहनांच्या हालचालीवरुन त्यांचा टोल वाहन मालकाच्या लिंक बँक अकाऊंट मधून कट होईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने गेल्या वर्षीपासून सुरु केलेल्या फास्ट टॅग नियमामुळे अनेक फायदे होत असल्याचे दिसून आले आहे. इंधनाची मोठी बचत होत असून व्यवहारात पारदर्शकता आली आहे.

तसंच भ्रष्टाचारही कमी झाला होण्यास मदत होईल. केवळ फास्ट टॅगमुळे टोल उत्पन्नात 20 कोटींची वाढ झाली आहे, असे गडकरी म्हणाले.

टोल नाक्यांच्या व्यवहारात होणारा प्रचंड गैर व्यवहार आणि त्यातून निर्माण होणारी नागरिकांची नाराजी यातून टोलसाठी नवी प्रणाली तयार करण्याचा आमचा प्रयत्न होता.

गेल्या वर्षभराच्या विचारविनिमयानंतर फास्ट टॅगची नवी प्रणाली लागू करण्यात आली. दररम्यान अजुनही अनेक वाहनांनी फास्ट टॅग लावलेलं नाही.

सर्वाधिक गर्दीचं शहर असलेल्या मुंबईत तर टोल नाक्यांमुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा येत असतो. ही नवी प्रणाली सक्षमपणे लागू झाली तर या सगळ्या कटकटींपासून वाहन चालकांची सुटका होणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24