अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया कडून मेलिंडा गेट्स फाउंडेशन यासारख्या भागीदारांसोबत विकसित केलेली देशातील पहिली न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस ‘न्यूमोसिल’ लसीच अनावरण केल.
हर्षवर्धन यांनी सांगितल की’ जगातील प्रत्येक तिसऱ्या मुलाला या कंपनीची लस दिली जाते. तर आता कोविड -19 च्या प्रसाराला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये या पहिली स्वदेशी न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस विकसित करण्यात आली आणि सरकारकडून परवाना प्राप्त करण्यात आला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ”आत्मनिर्भर भारत” च्या दृष्टीकोनातून ”सीरम इंस्टीट्यूट ची पहली स्वदेशी न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस ‘न्यूमोसिल’ चा एक आणि अनेक डोस देखील स्वस्त किंमतीत बाजारात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आता सामान्यना ही लस कधी मिळणार या कडे सगळ्याचं लक्ष लागले आहे.