अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- कोरोनामुळे संपूर्ण देशामध्ये तणावाचं वातावरण आहे. सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने काही योजनांची घोषणा केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 3 महिन्यांसाठी एलपीजी गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे.
यामुळे 8 कोटी महिलांना फायदा होणार आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत विनामूल्य गॅस सिलिंडर घेण्यासाठी आता तुम्हाला (लाभार्थी) प्रथम पैसे द्यावे लागतील.
आतापर्यंत असे होते की केंद्र सरकार लाभार्थ्यांच्या खात्यात आगाऊ रक्कम जमा करीत असे, जेणेकरुन ते नवीन भरलेले सिलिंडर घेऊ शकतील.
केवीएसआरओच्या अहवालानुसार आता हे होणार नाही, त्याऐवजी योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी गॅस सिलिंडरसाठी पैसे द्यावे लागतील.
त्यानंतर केंद्र सरकारकडून आपल्या खात्यात अनुदान पाठवले जाईल. म्हणजेच आपल्याला सिलिंडर विनामूल्य मिळेल. हे असे करण्यामागे सरकारचे विशिष्ट धोरण आहे.
अनेक लाभार्थी या योजनेचे मिळालेले पैसे इतरत्र खर्च कररायाचे. तर बरेच लाभार्थी पैसे मिळूनही सिलिंडर खरेदी करत नव्हते. म्हणूनच सरकारने आता प्रथम पेमेंट करण्याचा आणि नंतर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
द्रारिद्य रेषेखालील कुटुंबांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही योजना १ मे २०१६ पासून सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लोकांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्याबरोबरच मोफत गॅस सिलिंडरही देण्यात आले.
नंतर अनुसूचित जाती, जमाती आणि अंत्योदय योजना लाभार्थ्यांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आले.या योजने अतंर्गत कनेक्शन घेण्यासाठी बीपीएल कार्डधारक कुटुंबातील महिला यासाठी अर्ज करु शकते.
यासाठी आपल्याला केवायसी फार्म भरून आपल्या जवळील एलपीजी केंद्रात जमा करावा लागेल. पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा अर्जासाठी दोन पानांचा अर्ज,
आवश्यक कागदपत्रे, नाव, पत्ता, जन धन बँक खाते क्रमांक, आधार नंबर, आदींची आवश्यकता असते. आपण पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असल्यास आणि आपल्याला अनुदान मिळत
नसेल तर आपण शासनाने जारी केलेल्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार करू शकता. 1906 या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही तक्रार नोंदवू शकता.
तसेच, आपल्याला या योजनेशी संबंधित कोणतीही माहिती मिळवायची असल्यास आपण टोल फ्री क्रमांकावर 18002666696 वर कॉल करू शकता.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com