Sovereign Gold : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. तसेच सोने आणि चांदीच्या किमतीही खूपच वाढल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य नाही. पण आता सरकारच्या एका योजनेद्वारे तुम्ही स्वस्तात सोने खरेदी करू शकता.
होळीच्या मुहूर्तावर स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारकडून देशात स्वस्तात सोने विकले जाणार आहे. याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता. सरकारकडून १० मार्चपर्यंत स्वस्तात सोने दिले जाणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आजकाल 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सार्वभौम गोल्ड बॉन्ड (SGB) योजनेद्वारे देशातील नागरिकांना स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी देत आहे.
आता एक ग्रॅम सोने 5511 रुपयांना विकत घ्या
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सुरु करण्यात आलेल्या सार्वभौम गोल्ड बॉन्ड योजनेद्वारे 5,561रुपयांना १ ग्रॅम सोने खरेदी करता येऊ शकते. सरकारकडून १ ग्रॅम सोन्याची किंमत 5,561 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
पण जर तुम्ही हे सोने खरेदी करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन पेमेंट केले तर तुम्हाला 50 रुपयांची सूट देखील दिले जात आहे. म्हणजेच १ ग्रॅम सोने तुम्हाला फक्त 5,511 रुपयांना मिळेल. सोने खरेदीदारांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी आहे.
जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर (सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम तपशील) गुंतवणूकदार स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, NSE आणि BSE द्वारे खरेदी करू शकतात.
तुम्हाला सरकारच्या या योजनेद्वारे सोन्यामध्ये जास्त गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 4 किलो सोन्याचे बॉन्ड खरेदी करू शकता. याशिवाय जर तुम्ही ट्रस्ट किंवा कोणत्याही संस्थेबद्दलद्वारे खरेदी करत असाल तर ते 20 किलोपर्यंतचे बॉन्ड खरेदी करू शकतात.
सार्वभौम सुवर्ण योजनेबद्दल महत्त्वाच्या गोष्टी
गोल्ड बॉन्ड (सार्वभौम सोने) दर सदस्यता कालावधीच्या मागील आठवड्याच्या शेवटच्या तीन कामकाजाच्या दिवसांमध्ये 999 शुद्धतेच्या सोन्याच्या सरासरी दराच्या आधारावर निर्धारित केले जातात. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) 999 शुद्ध सोन्याचे दर प्रकाशित करते.
ऑनलाइन अर्ज आणि पेमेंटवर गुंतवणूकदारांना 50 रुपयांची सूट मिळेल.
बाँडची विक्री स्मॉल फायनान्स आणि पेमेंट बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, निवडक पोस्ट ऑफिस, NSE आणि BSE व्यतिरिक्त अनुसूचित व्यावसायिक बँकांद्वारे केली जाईल.
गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या नाममात्र मूल्यावर दर सहा महिन्यांनी वार्षिक 2.5 टक्के दराने व्याज मिळेल.