अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- भारत सरकारच्या मंत्रालयांमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. केंद्र सरकारचे कार्मिक व प्रशिक्षण विभाग (डीओपीटी), भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या मागणी पत्रानुसार, विविध मंत्रालये किंवा विभागांमध्ये संचालक व सहसचिव पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वाणिज्य व उद्योग मंत्रालय, महसूल विभाग, अर्थ मंत्रालय व कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातील सहसचिव स्तरावर नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या सर्व भरती करारानुसार असतील.
या व्यतिरिक्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातील इतर अनेक विभाग व मंत्रालयांमध्ये संचालक स्तरावर अर्ज मागविण्यात आले आहेत. ही पदेही कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केली जातील. यामध्ये केवळ मुलाखतीच्या आधारे नियुक्ती केली जाईल. मुलाखतीसाठी ऑनलाईन केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल.
येथे संचालक स्तरावर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत –
– वाणिज्य व उद्योग मंत्रालय
– वित्त सेवा विभाग, अर्थ मंत्रालय
– आर्थिक व्यवहार विभाग, अर्थ मंत्रालय
– कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
– कायदा आणि न्याय मंत्रालय
– शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय
– उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय
– ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय
– आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
– रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
– जल ऊर्जा मंत्रालय
– नागरी उड्डाण मंत्रालय
– कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय
22 मार्चपर्यंत अर्ज करता येतील –
या पदांवर भरतीसाठी सविस्तर जाहिरात व उमेदवारांना आवश्यक सूचना 06 फेब्रुवारी 2021 रोजी आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केल्या जातील. इच्छुक उमेदवार 06 फेब्रुवारी 2021 ते 22 मार्च 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्जात त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांची यादी केली जाईल.