अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- रिलायन्स जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांना नव वर्षाचे गिफ्ट दिले आहे.उद्यापासून म्हणजेच १ जानेवारीपासून जिओच्या ग्राहकांना मोफत लोकल व्हॉइज कॉल्स करता येणार आहेत.
काही महिन्यांपूर्वी जिओने इतर कार्डवर कॉल केल्यास पैसे आकारायला सुरुवात केली होती. त्यामुळे रिलायन्स कार्डधारकांमध्ये नाराजी पसरली होती.
जिओने त्यासाठी अनेक प्लॅन्स पण जाहीर केले होते. रिलायन्स जिओने या सेवेची घोषणा करताना सांगितले आहे की रिलायन्स जिओच्या ग्राहकांनी इतर कंपन्यांची सेवा वापरात असलेल्या ग्राहकांना कॉल केल्यास आता त्यांना चार्ज पडणार नाही.
त्यांनी हि घोषणा टेलीकॉम अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून केली.१ जानेवारीपासून डोमेस्टिक व्हाईज कॉल्ससाठी आयसीयू आकारणी थांबवण्यात येणार आहे.
हा निर्णय कंपनीने सप्टेंबर २०१९ मध्ये घेतला होता. त्यात सांगितले होते की, रिलायन्स जिओच्या ग्राहकांनी दुसऱ्या नेटवर्कवर कॉल केल्यास त्यांना पैसे आकारले जातील.यासाठी कंपनीने ट्रायच्या आयसीयू शुल्काचा संदर्भ दिला होता.
आता मात्र कंपनीने हि शुल्क आकारणी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे रिलायन्स जिओन लोकल ऑफनेट कॉल्स मोफत असतील अशी घोषणा केली आहे.