अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियातून स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप हैदराबाद विमानतळावर पोहोचली आहे.
त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. रशियाची ही लस भारतात सुरू असलेल्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात खूप मदत करेल.
असा विश्वास आहे की यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होईल. रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेफ एक मे 2021 रोजी भारतात दाखल झाली होती.
हिमाचल प्रदेशमधील कसौलीतील सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीत या लसीच्या चाचण्या घेतल्यानंतर सरकारकडून याला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
लॅबला स्पुटनिक लशीचे 100 नमुने पाठवण्यात आले होते. लशीची कार्यक्षमता, प्रभाव आणि त्याचे दुष्परिणाम या निकषांवर चाचणी घेण्यात आली.
दरम्यान स्पुटनिक -व्ही ही भारत सरकारकडून वापरण्यास देण्यात आलेली तिसरी लस आहे. तत्पूर्वी, सरकारने कोविशिल्ड आणि कोवाक्सिन वापरण्यास परवानगी दिली.
भारत बायोटेकची कोविशील्ड सीरम इन्स्टिट्यूटमध्ये विकसित केली गेली आहे. महत्त्वाचे म्हणजे स्पुटनिक व्ही लसची पहिली खेप या महिन्याच्या सुरूवातीस रशियाकडून पाठविली गेली होते.
लसीची भारतातील किंमत :- रशियाच्या ‘स्पुटनिक V’ (Sputnik V) लशीची किंमत भारतात 995.40 रुपये असणार आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
लशींच्या किंमतीवर 5 टक्के जीएसटी लागू असेल. लशींची निर्मिती भारतात होऊ लागल्यास याची किंमत आणखी कमी होईल.