अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- कोरोना लस बाबतच्या सकारात्मक माहिती समोर येऊ लागल्याने आता हळूहळू बाजारपेठांमध्ये देखील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळू लागले आहे.
यामुळे शेअर बाजारमध्ये देखील आता तेजी पाहायला मिळते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या तेजीमुळे भारतीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजातही मोठी तेजी पाहायला मिळाली.
आठव्याच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजेच बुधवारी मुंबई शेअर बाजार 310 अंकांच्या तेजीसह 46573 अंकानी सुरु झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजार 96 अंकांच्या तेजीसह 13663.10 अंकांनी सुरु झाला.
बाजाराच्या सुरुवातीला एकूण 1094 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी बघायला मिळाली. तसेच, 250 कंपन्यांच्या शेअर्सची किंमत कमी झाल्याचे पाहाया मिळाले.
भारतीय शेअर बाजारात M&M, ONGC, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, नेस्ले या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. मेटल और ऑटो क्षेत्रातील उद्योगांच्या निर्देशांकामध्ये 1-1 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तसेच एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, टायटनसारख्या कंपन्यांचे शेअर्स मुंबई शेअर बजारात 52 आठवड्यांतील सर्वोच्च स्तरावर पोहोचले.