खुशखबर! ‘या’ दिवशी भारतात दाखल होणार कोरोना लस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- देशात गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. यामुळे देशासह जगभरात अनेकांचे बळी गेले आहे. दरम्यान कोरोनाला अटकाव करण्यासाठी जगभरातून प्रयत्न केले जात आहे.

यातच देशवासियांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशात लवकरच कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी लशीकरण सुरु होणार आहे. २८ डिसेंबर रोजी दिल्लीत कोरोना लशीची पहिली खेप येणार आहे.

देशात कोरोना लशीची तयारी चार वेगवेगळ्या कंपन्या करत आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच कोरोना लस उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं होतं.

भारतात दाखल होणारी ही कोरोना लस साठवण्यासाठी राजीव गांधी रुग्णालयात डीप फ्रीजरची सोय करण्यात आली असल्याची माहिती रुग्णालयाच्या नोडल अधिकाऱ्यांनी दिली. जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरण सुरु होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी दिली.

दरम्यान भारतात कोणत्याही लस निर्मिती कंपनीला कोरोना लशीच्या आपतकालीन वापरास मंजुरी देण्यात आलेली नाही. दरम्यान देशात लसीकरणासाठी राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर टास्क फोर्स तयार करण्यात आले आहे. मास्टर ट्रेनर्संना ट्रेनिंग देण्यात आली आहे, जे देशातील हजारो स्वयंसेवकांना ट्रेनिंग देतील.

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार, २६० जिल्ह्यातील २० हजारांपेक्षा अधिक लोकांना आतापर्यंत ट्रेनिंग मिळाली आहे.

२८ डिसेंबरला कोरोना लशीची पहिली खेप येईल. या दिवशी कोरोना लशीचे ८० लाख डोस आपल्याला मिळतील असे दिल्ली एअरपोर्टचे सीईओ विदेह कुमार जयपुरिया यांनी सांगितले. मात्र, ही लस कोणत्या कंपनीची असेल हे अद्याप जाहीर झालेले नाही.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24