खुशखबर ! KTM 890 Duke लवकरच भारतात होणार लाँच

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- दुचाकी प्रेमींसाठी आम्ही एक महत्वाची व आनंदाची माहिती घेऊन आलो आहे. रेसिंग बाईक व स्पोर्टी लूक साठी प्रसिद्ध असलेली KTM बाईक तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.

2021 KTM 890 ड्युक लवकरच भारतीय मार्केटमध्ये लाँच केली जाणार आहे. 890 ड्युक पहिल्यांदा 2020 मध्येच सादर करण्यात आली होती.

790 ड्युक जगभरात बंद केल्यानंतर आता केटीएम कंपनीकडून स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत की, 890 ड्युक लवकरच भारतात लाँच केली जाईल.

नवीन बाइकमध्ये मिळणार अनेक आकर्षक फीचर्स डिझाईन आणि स्टायलिंगबाबत बोलायचे झाल्यास ड्यूक 890 बाईक ही 890 R प्रमाणेच आहे.

यामध्ये केवळ नवीन रंग आणि ग्राफिक्सचा समावेश केला जाणार आहे. या बाईकमध्ये शार्प लाइन्स, अँग्युलर एलईडी हेडलाईट, चिसल्ड फ्युल टँक आणि स्टेप सीट्स दिले जाऊ शकतात.

या बाईकमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, एबीएस, कॉर्निंग एबीएस, व्हीली कंट्रोलसारखे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. ही बाईक लवकरच लाँच केली जाऊ शकते, या बाईकची अंदाजे किंमत 9.5 लाख रुपयांच्या आसपास असू शकते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24